Bajra Rice : काय सांगता! तांदळाप्रमाणे ज्वारी आणि बाजरीचा सुद्धा मऊ भात बनतो; वाचा रेसिपी

Bajra Rice Recipe : बाजरी या धान्यापासून सुद्धा भात बनवला जातो. हा भात आपल्या आरोग्यासाठी फार पौष्टिक असतो. सहसा बाजरीची फक्त भाकरी बनवली जाते.
Bajra Rice Recipe
Bajra RiceSaam TV
Published On

महाराष्ट्रातील विविध पदार्थांमध्ये भात हा फार कॉमन पदार्थ आहे. प्रत्येक व्यक्ती रोजच्या आहारात भाताचा समावेश करतात. भात खाल्ल्याने पोट पटकन भरतं आणि झोपही लागते, असं काही जण म्हणतात. आता तुम्ही देखील रोज तांदळाचा भात खात असाल. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? जसं आपण तांदूळपासून भात बनवतो तसेच ज्वारी किंवा बाजरी अशा धान्यापासून सुद्धा भात बनवता येतो.

Bajra Rice Recipe
Janmashtami Prasad Recipe: जन्माष्टमीनिमित्त घरच्याघरी बनवा गोपाळकाला; वाचा सिंपल रेसिपी

अनेक व्यक्तींना याबद्दल माहिती नाही. मात्र बाजरी या धान्यापासून सुद्धा भात बनवला जातो. हा भात आपल्या आरोग्यासाठी फार पौष्टिक असतो. सहसा बाजरीची फक्त भाकरी बनवली जाते. मात्र काहींना भाकरी आवडत नाही. त्यामुळे त्यांना ज्वारीमधील पोषक तत्व सुद्धा मिळत नाहीत. आता तुमच्या घरात सुद्धा बाजरीची भाकरी कोणी खात नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही बाजरीचा भात बनवू शकता. हा भात कसा बनवायचा त्याची रेसिपी आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

बाजरी

पाणी

पीठ

कृती

आपण रोजचा भात जसा बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा ज्वारीचा भात सुद्धा बनवायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला बाजरी स्वच्छ निवडून घ्यावी लागेल. बाजरी छान निवडून झाली की ती पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर बाजरी पाण्यात भिजत ठेवा. बाजरी अगदी 6 ते 7 तास तुम्हाला भिजत ठेवावी लागेल. बाजरी छान मऊ व्हावी यासाठी ही स्टेप महत्वाची आहे. तुम्ही रात्री झोपताना बाजरी पाण्यात भिजत ठेवू शकता.

त्यानंतर सकाळी उठल्यावर यातील पाणी गाळून घ्या. या पाण्यावर एक थर वरती आलेला दिसेल. हे पाणी सुद्धा चांगलं गाळून घ्या. तसेच बाजरी दुसऱ्या एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. बाजरी स्वच्छ दुसऱ्या पाण्याने धुतल्यावर एक कुकर घ्या. या कुकरमध्ये बाजरी टाकून घ्या. त्यानंतर यात बाजरी टाका आणि पाणी मिक्स करा. बाजरी शिजण्यासाठी कुकरमध्ये एक इंच जास्त पाणी टाका. त्यानंतर मीठ मिक्स करा आणि झाकण बंद करून या बाजरीचा मस्त शिट्ट्या लावून घ्या.

बाजरी कडक असते त्यामुळे ती पटक शिजत नाही. त्यामुळे किमान 5 ते 6 शिट्ट्या घ्या. यावर बाजरी छान आणि मस्त शिजते. त्यानंतर तयार झाला तुमचा बाजरीचा भात. हा भात तुम्हाला हवं तसं तुम्ही खाऊ शकता. यात तुम्ही आमटी, डाळ किंवा मग नुसता भात सुद्धा खाऊ शकता. बाजरी चवीला गोड असते. त्यामुळे भात सुद्धा काही प्रमाणात गोड लागतो.

Bajra Rice Recipe
Aluche Fadfade Recipe: रिमझिम पावसात जेवणात बनवा गरमागरम अळूचं फदफदं, सोपी रेसिपी वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com