Relationship Tips Canva
लाईफस्टाईल

Relationship Tips : लग्नानंतर सासू-सासऱ्यांसोबत 'असे' संबंध ठेवा, मग कधीच उडणार नाही तुमच्या नात्यात खटके..

After Marriage Relationship Tips : लग्नानंतर तुमचे सासू-सासऱ्यांसोबत रोज खटके उडत आहेत. तुम्हालाही तुमच्या सासू-सासऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यात अडचण येत असेल, तर 'या' टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.

Shreya Maskar

लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचे आयुष्य बदलते. लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नसून संपर्ण कुटुंबाशी आपले नाते जोडले जाते. लग्नानंतर जोडीदारासोबतच संपूर्ण कुटुंबाशी जुळवून घेणे हे सर्वात मोठे आव्हान असते. त्यामुळे सर्वांशी मिळूनमिसळून वागणे योग्य ठरेल. पण यातही काही वेळा सासू-सासऱ्यांशी आपले संबंध बिघडू लागले तर अडचणी वाढतात. त्यामुळे योग्य वेळी आपली मते मांडणे महत्त्वाचे आहे. लग्नानंतर सासू-सासऱ्यांसोबत आपले नाते कसे घट्ट करावे यांच्या टिप्स जाणून घ्या...

लग्नाआधीच तुमची मते स्पष्टपणे मांडा

लग्नाआधीच आपली स्पष्ट मते सासरच्या मंडळींना सांगावी. जेणेकरून पुढे जाऊन काही समस्या उद्भवणार नाही. सासरचे लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुमच्या स्वभावावर अवलंबून असते. त्यामुळे आपली वागणूक चांगली आणि स्पष्ट ठेवा. तुमच्या मर्यादा तुम्ही निश्चित करा. तुमच्या आयुष्याचे सर्व निर्णय तुम्ही घेणार असून त्यांच्या परिणामाची जबाबदारी देखील तुम्ही घ्याल हे स्पष्टपणे सांगा. सासरच्यांचा एखादा मुद्दा पटत नसेल तर आपले मत देऊन तो मुद्दा तिथेच सोडून द्या. विनाकारण कोणताही मुद्दा ताणू नये.

सासू-सासऱ्यांसोबतच्या भांडण्यात जोडीदाराला आणू नये

तुमच्यात आणि सासू-सासऱ्यात काही वाद असतील तर यात जोडीदाराला मध्ये आणू नये. त्यामुळे नाती आणखी बिघडू शकतात. तुमच्या समस्या किंवा भांडणे तुम्ही सासरच्या मंडळीसोबत बसून स्वतः सोडवा. बोलताना सासू-सासऱ्यांचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे पालकांच्या भावना दुखावल्या जातील आणि जोडीदाराशी आपले संबंध देखील बिघडतील. तुमची बाजू शांतराहून ठामपणे मांडा. सासू-सासऱ्यांना समजवून सांगा आणि त्यांना समजून घ्या. म्हणजे मतभेद होणार नाहीत आणि एखाद वेळ झाले तरी शांतपणे कोणालाही न दुखवता मिटतील.

गोष्टी ऐकून घेण्याची सवय ठेवा

तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमच्या सासू-सासऱ्यांचे मत घ्या. कारण त्यांनी तुमच्यापेक्षा अनेक पावसाळे पाहिले आहेत. ते नक्कीच तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. तुमची मते सासरच्या मंडळींशी मुळेच जुळणार नाही. कारण यात दोन पिढींचे अंतर आहे. अशा परिस्थितीत, आपले मत लादण्याऐवजी, त्यांचे ऐका आणि शेवटी आपला मुद्दा स्पष्टपणे त्यांना समजवून सांगा. तरीही ते त्यांना पटत नसेल तर मुद्दा तिथेच बंद करा.

आरोग्याची काळजी

कितीही वादविवाद झाले तरी आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यावी. आपल्या आईवडिलांसारखे त्यांनाही जपावे. यामुळे तुमचे नाते चांगले होईल आणि मोठ्याचा आशीर्वादही मिळेल. तुम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही याची काळजी घ्या.

तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या

तुमच्या चांगल्या वागणूकीनंतरही तुमच्या सासरचे तुमच्याशी वाईट वागत असतील तर आपल्या आईबाबांशी बोलून यावर योग्य तो मार्ग काढा. या गोष्टी मनात ठेवू नका. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. तसेच नाते अजून कमकूवत होते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT