Pranayama Benefits : रोज ५ मिनिटे करा प्राणायम, मानसिक आरोग्य राहिल निरोगी

Physical And Mental Health : आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण व्यायाम करतात. परंतु, जितके शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे तितकेच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्य निरोगी राहाण्यासाठी प्राणायम सगळ्यात फायदेशीर आहे.
Pranayama Benefits
Pranayama BenefitsSaam Tv
Published On

Pranayama Benefits For Health :

आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण व्यायाम करतात. परंतु, जितके शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे तितकेच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्य निरोगी राहाण्यासाठी प्राणायम सगळ्यात फायदेशीर आहे.

प्राणायमामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. यामध्ये श्वासोच्छवासावर वेगवेगळ्या प्रकारे आणि ठराविक कालावधीसाठी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जो आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. प्राणायम केल्याने आरोग्याला (Health) अनेक फायदे (Benefits) मिळतात. त्यामुळे योग करणे अधिक चांगले मानले जाते. जाणून घेऊया प्राणायम केल्याने शरीराला कसा फायदा होतो.

1. चांगली झोप

आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) शांत झोप कुणालाही लवकर लागत नाही. सततच्या नकारात्मक विचारामुळे, कामाच्या व्यापामुळे झोपेच्या अनेक समस्या उद्भवतात. शरीर थकलेले असूनही झोप लागत नाही. यासाठी नियमितपणे प्राणायम केल्याने शरीरासोबत मनाला आराम मिळतो. ज्यामुळे चांगली झोपही लागते.

Pranayama Benefits
Office Chair Side Effects : ऑफिसमधील खुर्ची ठरु शकते जीवघेणी; टार्गेट सोडून २२ मिनिटे करा हे काम

2. फुफ्फुसासाठी फायदेशीर

प्राणायम केल्याने फुफ्फुस मजबूत होण्यास मदत होते. प्राणायम करताना दीर्घ श्वास घ्या, ज्यामुळे फुफ्फुसातील अल्व्होलीमध्ये ऑक्सिजन पोहोचवते. तसेच फुफ्फुसाचे स्नायू देखील मजबूत होतात. फुफ्फुसे निरोगी हवे असतील तर प्राणायम करणे खूप फायदेशीर आहे.

3. रक्तदाब कमी करतो

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. उच्च रक्तदाबामुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहाणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी नियमितपणे प्राणायम करायला हवे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहिल.

Pranayama Benefits
Aurangabad Travel Place : पर्यटकांना भुरळ घालणारी औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळे, सुट्टीच्या दिवशी नक्की जा

4. ताण कमी करते

सध्या तणावाचा शिकार होताना अनेकजण दिसून येत आहे. वाढत्या तणावामुळे आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी प्राणायम फायदेशीर ठरते.

5. मानसिक आरोग्य

प्राणायम करताना श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करायला हवे. यामुळे श्वासोच्छवास अधिक जागरुक होऊन माइंडफुलनेस वाढण्यास मदत होते. प्राणायम हा ध्यान करण्याचा मार्ग आहे. ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com