Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : सासुबाई तुमच्याविरुद्ध पतीला भडकवत आहेत? मग 'या' टिप्स नक्की वाचा

Relationship Tips with Mother in Law : अजूनही अनेक घरात महिलांना सासुबाईंचा त्रास सहन करावा लागतो. अशा महिलांसाठी आम्ही काही उपाय आणि ट्रिक्स शोधल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सासू आणि सून हे असं नातं आहे जिथे कायम वाद आणि भांडणं पाहायला मिळतात. काळानुसार आता व्यक्तींची मानसीकता बदलत चालली आहे. मात्र अजूनही अनेक घरात महिलांना सासुबाईंचा त्रास सहन करावा लागतो. अशा महिलांसाठी आम्ही काही उपाय आणि ट्रिक्स शोधल्या आहेत.

शांत राहा

काहीवेळा सासू आणि सूनेचे भांडण होते तेव्हा काही चूक नसतानाही सासुबाई सूनेला ओरडतात. अशावेळी तुम्ही शांत राहणे योग्य आहे. कारण भांडून वाद आणखी वाढण्याऐवजी कायम शांत राहा. शांत राहिल्याने सासुबाईंची चूक अपोआप सर्वांसमोर येईल.

पतीकडे सतत तक्रार करू नका

काही सासू आपल्या सूनेला त्रास देण्यासाठी मुलाला तिच्याबद्दल वाईट सांगतात आणि वाद वाढतो. त्यामुळे असे तुमच्याबरोबर सुद्धा घडत आहे, असं वाटत असेल तर तुम्ही पतीकडे सासूची तक्रार करू नका. असे केल्याने पतीच्या मनात तुमच्याविषयी राग निर्माण होईल.

सासूविषयी काळजी

सासूने पतीला तुमच्याविषयी वाईट सांगितले असेल तेव्हा तुम्ही सासूविषयी फार छान बोला. तुम्हाला सासूची किती काळजी आहे. त्या किती चांगल्या आहेत, हे तुमच्या नवऱ्याला पटवून द्या. असे केल्याने तुमच्या पतीच्या मनात तुमच्याविषयी राग निर्माण होणार नाही.

खरं बोला

कितीही वाद झाला तरी पतीशी कायम खरं बोला. अनेकदा वयानुसार काही सासू आपल्या सूनेवर राग काढतात. त्यामुळे जेव्हा तुमच्याबरोबर असं काही घडत असेल तेव्हा पतीसोबत खरं बोला. त्यामुळे अनेक प्रसंगांमध्ये सासुबाई तुमच्याशी भांडत असताना पती आईला चूक काय आणि बरोबर काय हे समजावून सांगेल.

सासुबाईंच्या आवडीचे पदार्थ बनवा

जेव्हा जेव्हा सासुबाई तुमच्यावर रागवतील तेव्हा त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्यासाठी बनवा. असे केल्याने सासुबाईंच्या मनातील राग प्रेमात बदलेले आणि त्या काही दिवसांनी सूनेचा आदर करत तुम्हाला हवे तसे राहण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Baby Care: लहान बाळांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका; नाहीतर होईल हे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT