Relationship Tips : क्रशला मनातली गोष्ट सांगायची आहे? पण ती भावच देत नाही, मग 90s च्या 'या' टिप्स नक्की वापरा

Tips For Boys : तुम्ही सुद्धा चॅटवर विविध प्रश्न विचारत मुलींना इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही प्रेयसीला पत्र लिहा.
Tips For Boys
Relationship Tips Saam TV

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रेमात पडतो. प्रेमात पडणे, एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त स्पेशल वाटणे, आवडू लागणे या फार छान फिलिंग्स असतात. मात्र या भावना व्यक्त करणे तितकंच कठीण असतं. मनातलं गुपीत समोरच्या व्यक्तीला सांगताना अनेक मुलं नर्वस होतात. हृदयातली धडधड आधीपेक्षा थोडी जास्त वाढते.

Tips For Boys
Relationship Tips: पार्टनर कसा असावा?

आपल्या क्रशला किंवा आवडत्या व्यक्तीला मुलं मनातल्या भावना व्यक्ती करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतात. मात्र सर्वातच ते सफल होत नाहीत. अनेकदा मुलींना ते चांगल्या प्रकारे इंप्रेस करत नाहीत आणि मग मुलींकडून नकार मिळतो. त्यामुळे अशा मुलांसाठी आम्ही 90s च्या काही टिप्स घेऊन आलो आहोत.

चॅट नको पत्र लिहा

मुलींना कायम आपल्यासाठी वेगळं, भन्नाट आणि काहीतरी स्पेशल करणारी मुलं आवडतात. त्यांच्याबरोबर चॅट अनेक मुलं करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा चॅटवर विविध प्रश्न विचारत मुलींना इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही प्रेयसीला पत्र लिहा.

एखादं गाणं डेडीकेट करा

तुम्हाला गाता येत नसेल तरी देखील आवडत्या मुलीला भेटल्यावर ती एकटी असल्यास तिच्यासाठी एखादं गाणं गा. तिला ते गाणं डेडीकेट करा.90S च्या काळात चित्रपटांमध्ये पाहाल तर अनेक मुलं अशाच पद्धतीने मुलींना इंप्रेस करताना दिसतील.

स्ट्रीट फूड डेट

तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत डेटला जाऊ शकता. मनातली गोष्ट व्यक्त केली नसेल तर तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत स्ट्रीट फूड डेटला जाण्याता प्लान करा. यामुळे तुम्हाला त्या मुलीला काय काय खायला आवडते ते समजेल. शिवाय तुम्हाला एकमेंकांशी जास्त बोलता येईल. तसेच विविध गोष्टी जाणून घेता येतील.

Tips For Boys
Relationship Tips : तुमचा पती सुद्धा माहेरच्या व्यक्तींची खिल्ली उडवतो; 'या' टीप्सने डोकं ठिकाण्यावर येईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com