Arranged Marriage Tips Saam TV
लाईफस्टाईल

Arranged Marriage Tips : अरेंज-मॅरेज करताना पार्टनरला चुकूनही 'या' गोष्टी सांगू नका; नात्यात दूरावा येईल

Relationship Tips : अरेंज-मॅरेज केलेल्या जोडप्यांमध्ये जास्त वाद होतात. त्यामुळे अरेंज -मॅरेज करत असाल तर तुमच्या पार्टनरला पुढील गोष्टी कधीच सांगू नका.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात असते. मुली तसेच मुलांवर देखील लग्नानंतर विविध जबाबदाऱ्या वाढतात. लग्नानंतर प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या जोडीदाराकडून विविध अपेक्षा असतात. अनेकदा या अपेक्षा पूर्ण न झाल्यास नात्यात दूरावा येतो.

अरेंज -मॅरेज करत असताना आपण आपल्या पार्टनरला पूर्णत: ओळत नसतो. अशावेळी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून पार्टनरशी वागताना, बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. अनेकदा अरेंज-मॅरेज केलेल्या जोडप्यांमध्ये जास्त वाद होतात. त्यामुळे अरेंज -मॅरेज करत असाल तर तुमच्या पार्टनरला पुढील गोष्टी कधीच सांगू नका.

एक्स बद्दल

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. आपलं प्रेम शेवटपर्यंत टिकावं असं सर्वांनाच वाटतं. त्यासाठी काही कपल प्रयत्न देखील करतात. मात्र ते प्रेम शेटपर्यंत टिकतंच असं नाही. अशावेळी जेव्हा आपण अरेंज -मॅरेज करतो तेव्हा पार्टनरवर विश्वास ठेवून आपण त्याला आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी सांगतो, मात्र प्रत्येकाला हे पटेलच असं नाही. त्यामुळे कधीही आपल्या एक्सबद्दल पार्टनरला सांगू नका.

तुमच्या कुटुंबातील वाद

प्रत्येक कुटुंबात भाऊ, बहिण, आई-बाबा कितीही चांगले असले तरी काही ना काही कारणावरून त्यांच्यात वाद होतात. हे वाद फार शुल्लक असतात. आपण आपल्या पार्टनला समजदार समजून त्या गोष्टी सांगतो. मात्र काही दिवसांनी पार्टनर आपल्याशी भांडताना आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या वागण्यावरून आपल्याला बोलू शकतो. त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील पर्सनल गोष्टी पार्टनरला कधीच सांगू नका.

आर्थिक गोष्टी

अरेंज -मॅरेज करताना दोन्ही कुटुंब अनोळखी असतात. त्यामुळे नॉरमल बोलत असताना आपण आपल्या आर्थिक गोष्टी त्यांच्याशी शेअर करतो. शेती, घर, जमीन या सर्व गोष्टी सांगताना बडेजाव करू नका. कारण लग्नामध्ये हुंडा पद्धती बंद झाली असली तरी मुलींचे लग्न करताना वडिलांनी मुलीला भरपूर सोनं द्यावं, आर्थिक मदत करावी अशा भावना समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे आपल्या संपत्तीचा बडेजाव करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

SCROLL FOR NEXT