Marriage Tips : तुम्ही देखील अरेंज मॅरेज करताय ? तर 'या' 5 गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या !

Marriage Tips For Couples : काही लोकांना प्रेमविवाह करणे आवडते तर बऱ्याच लोकांना अरेंज्ड मॅरेज करणे चांगले वाटते.
Marriage Tips
Marriage TipsSaam Tv
Published On

Weeding Tips : लग्नाविषयी प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक मत असते. त्यामुळे काही लोकांना प्रेमविवाह करणे आवडते तर बऱ्याच लोकांना अरेंज्ड मॅरेज करणे चांगले वाटते. कारण अरेंज्ड मॅरेज कुटुंबीयांच्या सहमतीने होते.

जर तुम्ही अरेंज्ड मॅरेज करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कशी गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात तुमच्या नात्यात (Relation) समस्या निर्माण होऊ शकतात. वधू आणि वर अरेंज्ड मॅरेज दरम्यान एकमेकांनसाठी पूर्णपणे अनोळखी असतात.

Marriage Tips
Reason Why Some Women Stop Doing Oral Physical Relation : 'या' 5 कारणांमुळे महिला देत नाही आपल्या पार्टनरला मुखमैथुनचा आनंद !

अशा स्थितीत दोघांच्या लग्नाकडून खूप अपेक्षा असतात. पण लग्नानंतर (Marriage) नात्यात हळूहळू अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे अरेंज्ड मॅरेज करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता.

1. प्रेमाला वेळ लागेल

अरेंज्ड मॅरेज दरम्यान तुम्ही जोडीदाराला खूप कमी वेळ भेटता. त्यामुळे अशा वेळेस तुम्ही लगेच जोडीदाराच्या प्रेमात (Love) पडू शकत नाही. लग्नानंतर जोडीदाराला थोडाफार वेळ देणे आवश्यक आहे. तसेच हळूहळू जोडीदाराला (Partner) जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्यातील प्रेम वाढू लागेल.

2. जोडीदाराचा स्वभाव कसा आहे पहा

जोडीदाराचा चेहरा पाहून अरेंज्ड मॅरेज दरम्यान होकार देतात. परंतु एखाद्या व्यक्तीचा दिसण्यापेक्षा त्यांचा स्वभाव अधिक जास्त महत्त्वाचा असतो. म्हणून अरेंज्ड मॅरेज करताना जोडीदाराच्या चेहऱ्यापेक्षा त्यांचे वागणे समजून घ्या. ज्यामुळे तुमचे नाते घट्ट होईल.

Marriage Tips
Relationship Tips : तुमच्या लाईफ पार्टनरला जुन्या प्रेम संबंधाविषयी सांगायचे की नाही? जाणून घ्या

3. पालकांच्या निर्णयाचा आदर करा

आई – वडील कधीही आपल्या मुलांबद्दल वाईट विचार करत नाहीत. त्यामुळे पालकांनी तुमच्यासाठी जोडीदार निवडला असेल तर पालकांच्या निर्णयाचा आदर करा. कारण असे म्हणतात आयुष्यात आई – वडीलांपेक्षा चांगला मार्गदर्शक दुसरा कोणीही होऊ शकत नाही.

4. रोमांस भरपूर असेल

लव मॅरेजमध्ये अरेंज्ड एकमेकांना अगोदरच ओळखतात. पण अरेंज्ड मॅरेजमधील जोडप्याना एकमेकांबद्दल काहीच माहित नसते. त्यामुळे अशा स्थितीत जोडीदाराविषयी नवनवीन गोष्टी रोज माहित होटाटा. ज्यामुळे नात्यात प्रेम तर वाढतेच आणि रोमांस भरपूर असतो.

Marriage Tips
Physical Relationship : कायम उत्तेजित राहतात, गुप्तांगही दुखतं... काय आहे हा ब्लू बॉल? ज्याविषयी तुम्ही कदाचित ऐकलंही नसेल!

5. नतमस्तक होणे

लग्नाचे हे नाजुक बंधन आयुष्यभर जपण्यासाठी लग्नानंतर प्रत्येकाला थोडेसे जुळवून घ्यावे लागते आणि जीवना होणारा नवीन बदल आनंदाने स्वीकारावे. त्यामुळे तुम्हाला कुटुंबाशी ताळमेळ राखण्यास मदत होईल. तसेच तुमचे लग्नाचे नातेही मजबूत होईल आणि दीर्घकाळ टिकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com