Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : स्वर्गाहून सुंदर होईल तुमचा संसार; फक्त 'या' गोष्टी फॉलो करा

Tips For Happy Married Life : वाद झाल्यावर आपल्या मनात पार्टनरविषयी द्वेष निर्माण होतो. सतत होत असलेल्या भांडणामुळे आपलं नातं तुटण्याच्या वाटेवर चालू लागतं.

Ruchika Jadhav

सुंदर आणि सुखी संसार असावा असं प्रत्येकाला वाटतं. सर्वजण यासाठी प्रयत्न सुद्धा करतात. मात्र नात्यात काही ना काही कारणावरून वाद होत असतात. वाद झाल्यावर आपल्या मनात पार्टनरविषयी द्वेष निर्माण होतो. सतत होत असलेल्या भांडणामुळे आपलं नातं तुटण्याच्या वाटेवर चालू लागतं.

मात्र प्रत्येक व्यक्तीला आपलं नातं आणि संसार टिकवायचा असतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत. या टीप्स फॉलो केल्याने तुमचं आणि पार्टनरचं नातं आणखी घट्ट होईल.

गरज नसताना संशय घेऊ नका

काही व्यक्तींना आपल्या पर्टनरच्या काही चुका माहीत असतात. त्यामुळे पार्टनर पजेसिव्ह होतात. आपल्या जोडीदाराला गमवण्याची भीती त्यांच्या मनात असते. आपली चूक मान्य करून पार्टनरणे पुन्हा तुमच्याबरोबर एका नवीन आयुष्याला सुरुवात केली असेल तर पुन्हा तो विषय काढू नका. तसेच पार्टनवर संशय घेणे बंद करा. सतत संशय घेतल्याने तुमच्याबद्दल पार्टनरच्या मनातील प्रेम कमी होईल.

सल्ले घेऊ नका

प्रत्येक व्यक्तीचे लग्नानंतरचे आयुष्य सारखेच असते. नात्यात भांडणे आणि वाद असतातच. असे एकही पती-पत्नी नाहीत ज्यांचे विचार जुळत नाही आणि भांडणे होत नाहीत. त्यामुळे तुमचे भांडण झाल्यावर त्याबद्दल कुणालाच काही सांगू नका आणि शिल्लकचे लोकांचे सल्ले घेऊ नका. त्यामुळे तुम्ही तुमच्या नात्यात सुखी नसल्याचे इतरांना समजेल आणि चार माणसांत तुमचं हसं होईल. त्यामुळे स्वत:च्या पार्टनरला जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा.

तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका

अनेकदा सुखी संसार सुरू असताना दोघांमध्ये अचानक भांडणे सुरू होतात ती तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्यामुळे दोघांमध्ये कोणीही तिसरी व्यक्ती येणार नाही याची काळजी घ्या. एखादी तिसरी व्यक्ती आलीच तर दोघांनी समजूतीने आपले विषय सोडवा.

सासरच्या माणसांबद्दल वाईट बोलू नका

अनेक व्यक्ती आपल्या सासरी असलेल्या व्यक्तींबाबत वाईट बोलतात. मात्र पती आणि पत्नी दोघांनी समान प्रमाणात आपल्या सासरच्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे. शिवाय त्यांच्याबद्दल खोटं बोलणं सुद्धा बंद केलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT