Relationship Tips : ओव्हर पझेसिव्ह गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडमुळे वैताग आलाय; मग 'या' टिप्सने सर्व काही सुरळीत होईल
आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्ती बद्दल आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी जाणून घ्याव्या वाटतात. प्रेम करणारी जोडपी कायम आपल्या पार्टनरबद्दल सर्व अपडेट ठेवत असतात. काही नात्यांमध्ये पार्टनर जास्त पझेसिव्ह होतात. कोणत्याही नात्यासाठी पझेसिव्ह असणे फार घातक आहे. कारण असा स्वभाव असलेल्या व्यक्तीसोबत आपल्याला सतत दडपनात आणि घाबरून रहावं लागतं. तर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण मोकळेपणाने जगतो.
काळजीचे नाव पुढे करणे
काही पार्टनर मग गर्लफ्रेंड असो अथवा बॉयफ्रेंड खुप जास्त प्रमाणात पझेसिव्ह होतात. कुठे आहे? काय करत आहे? ऑफिस आणि घरी देखील सतत व्हिडिओ कॉल करणे. पार्टनर कामात असताना देखील सतत त्याला डिस्टर्ब करणे. असे करताना पार्टनर मला तुझी काळजी वाटते म्हणून असं वागत असल्याचं सांगतात. मात्र त्यांचं असं वागणं फार चुकीचं असतं.
पार्टनर पझेसिव्ह का होतात?
अनेक नात्यात जोडप्यांमध्ये पझेसिव्हनेस असण्याची विविध कारणे असू शकतात. त्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे पार्टनरवर विश्वास नसणे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्वत:चा काही ना काही पास्ट असतो. हा पास्ट सध्या असलेल्या पार्टनरला समजल्यावर त्याच्या मनात पझेसिव्हनेस तयार होतो.
पार्टनर पझेसिव्ह असल्यास ते कसं ओळखायचं?
पझेसिव्ह पार्टनर सतत तुमच्याशी कॉन्टक करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये त्यांना तुमची अजिबात काळजी नसते. ते सतत तुम्ही काय करत आहात याचे अपडेट घेत असतात. पार्टनर पझेसिव्ह असल्यास त्याच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होतो. पार्टनर सतत तुम्हाला तुमच्या कामाचे अपडेट देण्यास सांगत असतो. यामध्ये तुमच्या काळजीसाठी तो एकदाही तुम्हाला कॉल किंवा मॅसेज करत नाही.
पझेसिव्ह पार्टनशी कसं वागायचं?
पझेसिव्ह पार्टनशी वागताना कायम शांत राहिले पाहिजे. तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिल्यास असे पार्टनर तुमच्यावर आणखी राग व्यक्त करू शकतात.
पार्टनरला कोणत्या गोष्टीमुळे इनसिक्योर वाटत आहे ते शोधा. त्यानंतर पार्टनरची पालकांशी किंवा मित्रांशी भेट करून द्या.
पार्टनरच्या मनात तुमच्याविषयी संशय असल्यास तो संशय दूर करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.