Relationship Tips in Marathi Saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : 34 ते 38 वयोगटातील महिला अफेअर का करतात? रिलेशनशिप कोचने सांगितलं सिक्रेट

Relationship Tips in Marathi : 34 ते 38 वयोगटातील महिलांमध्ये अफेअर वाढल्याचा दावा केला जातो. याबाबत रिलेशनशिप कोचने माहिती दिली आहे.

Saam Tv

३४ ते ३८ वयोगटातील महिलांमध्ये अफेअरचे प्रमाण वाढल्याचा दावा केला जातोय

अफेअरमागे केवळ शारीरिक आकर्षण नसल्याचे सांगण्यात येतंय

नात्यातील प्रेमाचा अभाव, समजूतदारपणाची कमतरता आणि संवादाचा अभाव यामुळे महिलांमध्ये ताण वाढल्याचं रिलेशनशिप कोचचं म्हणणं आहे

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये चिटिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही अनेक पार्टनर एकमेकांवर फसवताना दिसतात. याचे अनेक कारणे समोर आले आहेत. लग्नानंतरच्या अफेअरमागे शारीरिक संबंध, आकर्षण असे अनेक कारणे असू शकतात. रिलेशनशिप कोच कोमलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत रिलेशनशिपविषयी माहिती दिली आहे.

रिलेशनशिप कोचचं म्हणणं आहे की, महिलांमध्ये चिटिंग करण्याच्या कारणांमध्ये शारीरिक संबंधाचं कारण फार कमी असतं. एकटेपणा, भावनिकता आणि स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न यामुळे देखील महिलांमध्ये चिटिंगचे प्रमाण वाढले आहे.

या वयोगटातील महिलांना भावनिकतेचा आधार लागतो. आई, पत्नी आणि घरातील केअरटेकर म्हणून घरात राबल्यानंतर अनेकांना स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्याची गरज भासू लागते. तसेच अनेकांना भावनिक जवळीकतेशिवाय शारीरिक संबंध पोकळ वाटू लागतात. या महिलांना जोडीदाराकडून प्रेम, समजूतदारपणा आणि सुरक्षित भावनिक नात्याची गरज भासते.

वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण व्हावी, अशी भावना निर्माण व्हायला लागते. कुटुंबाच्या बाहेर माझी काय ओळख आहे, असा प्रश्न महिला सातत्याने स्वत:ला विचारत असते.

जोडीदाराकडून प्रेम न मिळणे, दुर्लक्ष करणे या सारख्या गोष्टी वाढल्या. त्यानंतर अचानक महिलेच्या आयुष्यात एखादा नवा व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर तो अनेक गोष्टी पारखू लागतो. त्यामुळे महिलेला जुन्या नात्यात श्वास गुदमरला होता. त्यामुळे नव्या नात्यामुळे सुटकेचा निश्वास सोडल्याची भावना निर्माण होते.

वाढत्या वयात महिलांमध्ये होणारे अफेअर केवळ वासनेमुळे नाही. तर त्यांच्या गरजा पूर्ण न होणे आणि अनेक वर्षांपासून स्वतःला हरवल्यासारखं वाटण्यामुळे निर्माण होत असल्याचे रिलेशनशिप कोचं म्हणणं आहे. मी नात्यातील चिटिंगला कोणतंही प्रोत्साहन देत नसून केवळ माहिती देत असल्याचे रिलेशनशिप कोचने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT