Risk Of Stroke  Saam Tv
लाईफस्टाईल

Risk Of Stroke : नियमित तपासणी केल्याने टाळता येईल स्ट्रोकचा धोका, कशी घ्याल काळजी? तज्ज्ञांनी दिला सल्ला

Stroke Disease : शरीराला योग्य रक्तपुरवठा झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीतरित्या चालते. हृदयाचे काम हे शरीराच्या इतर भागांत रक्त पोहोचवणे आहे. कधीकधी रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्त गळते. अशाप्रकारचे जेव्हा रक्त मेंदूपर्यंत पोहोचत तेव्हा मेंदू काम करणे थांबवतो.

साम टीव्ही ब्यूरो

How To Prevent Risk Of Stroke :

शरीराला योग्य रक्तपुऱवठा झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीतरित्या चालते. हृदयाचे काम हे शरीराच्या इतर भागांत रक्त पोहोचवणे आहे. मात्र, मेंदूपर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे अनेक वेळा रक्त पुरवठा योग्यरित्या होत नाही. कधीकधी रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्त गळते. अशाप्रकारचे जेव्हा रक्त मेंदूपर्यंत पोहोचत तेव्हा मेंदू काम करणे थांबवतो.

अपोलो डायग्नोस्टिक्स नॅशनल टेक्निकल हेड आणि पॅथॉलॉजिस्टचे डॉ राजेश बेंद्रे म्हणतात. जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा अचानकपणे थांबतो किंवा कमी होतो तेव्हा स्ट्रोक येतो. अशावेळी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (मज्जातंतूसंबंधी समस्या) उद्भवतात. यामुळे इस्केमिक स्ट्रोक (मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात किंवा ब्लॉक होतात) आणि हेमोरेजिक स्ट्रोकची (मेंदूतील धमनी फुटते किंवा रक्त गळते) समस्या निर्माण होते.

स्ट्रोकचे परिणाम गंभीर असतात आणि त्यामुळे दीर्घकालीन अपंगत्व किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो. प्रत्येकाने स्ट्रोकची लक्षणे (Symptoms) ओळखणे आवश्यक आहे. जसे की अचानक शरीर सुन्न पडणे, गोंधळ उडणे, बोलण्यात अडचणी येणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी. ही लक्षणे दिसून येताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब, धूम्रपान, लठ्ठपणा आणि मधुमेह (Diabetes) यांसारखे घटकही स्ट्रोकला कारणीभूत ठरतात. याचे वेळीच निदान झाल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो.

या तपासणी वेळीच करा

  • नियमित तपासणी स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे आरोग्याची काळजी घेता येते. मेंदूच्या स्ट्रोकसाठी स्क्रीनिंग चाचण्या, जसे की कॅरोटीड अल्ट्रासाऊंड, कॅरोटीड धमन्यां अरुंद होणे किंवा त्यांच्या मार्गातील अडथळे शोधणे जे स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरतात.

  • रक्तदाब तपासणी, कोलेस्टेरॉल चाचण्या आणि मधुमेह तपासणी केल्याने स्ट्रोकचा धोका टाळता येणे शक्य आहे. हे संबंधीत व्यक्तीला जीवनशैलीत आवश्यक बदल आणि स्ट्रोकची संवेदनशीलता कमी करण्यासाठी योग्य वैद्यकीय उपचार मिळविण्यास मदत करतात.

  • नियमित तपासण्यांमुळे रुग्णांना स्ट्रोकच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरुक करण्याची संधी मिळते, त्यांना त्याबाबत पुरेसे ज्ञान देऊन सक्षम केले जाते.

  • चेहऱ्यावर किंवा हातपायांमध्ये अचानक बधीरपणा किंवा कमकुवतपणा जाणवणे, बोलण्यात अडखळणे आणि तीव्र डोकेदुखी यासारख्या लक्षणांबाबत नागरिकांनी जागरूक असणे आवश्यक आहे.

  • नियमित तपासण्यांद्वारे जागरूकता वाढवून आणि निरोगी आहाराचे सेवन करणे आणि शारीरिकरित्या सक्रिय राहणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या समुदायांमध्ये स्ट्रोकच्या घटना लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. हे सर्वच प्रयत्न स्ट्रोकशी दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी गरजेचे आहे.

  • स्ट्रोकच्या रूग्णांना दीर्घकालीन अपंगत्व आणि मृत्यूपासून वाचविण्यासाठी वेळीच निदान व उपचार आवश्यक आहे. अनेकदा नियमित तपासण्यांद्वारे तसेच लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास स्ट्रोक टाळता येतो किंवा त्याचा धोका कमी करता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT