Pregnancy Tips
Pregnancy Tips Saam Tv

Pregnancy Tips : गरोदरपणात मॉर्निंग सिकनेसमुळे वैतागले आहात? या गोष्टी लक्षात ठेवा

Morning Sickness Symptoms and Causes : पहिल्या तीन महिन्यात महिलांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. आनंद, दु:ख, चिंता आणि भीती यांसारख्या सर्व भावना मनात एकत्र असतात.

Morning Sickness In Pregnancy :

आई होण्याचा काळ जितका सुखद असतो तितकाच त्रासदायक. गरोदरपणात (Pregnancy) महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात मूड स्विंग आणि मॉर्निंग सिकनेस सारख्या गोष्टींमुळे त्रास होतो.

पहिल्या तीन महिन्यात महिलांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. आनंद, दु:ख, चिंता आणि भीती यांसारख्या सर्व भावना मनात एकत्र असतात. यामध्ये त्यांना उलट्या, मळमळ, मूड स्विंग्स, तणाव (Stress) यांसारख्या समस्यांना समोरे जावे लागते. या लक्षणांना (Symptoms) मॉर्निंग सिकनेस म्हणतात.

या काळात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. ज्यामुळे मॉर्निंग सिकनेसची लक्षणे जाणवतात. हा त्रास कसा कमी करायचा जाणून घेऊया.

1. थोड्या थोड्या वेळाने सतत खा रहा. पोट रिकामे राहिले की, हार्मोन्स अधिक सक्रिय होतात. या दिवसांमध्ये अधिक भूक लागते. अशावेळी भाजलेले मखाना, सुका मेवा, फळे यांसारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा.

Pregnancy Tips
Pregnancy Tips : वयाच्या चाळीशीत गर्भधारणेचा विचार करताय? कशी घ्याल काळजी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

2. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. अशावेळी हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, नट, बिया यांसारख्या मॅग्नेशियम असलेल्या पदार्थांचे सेवन करा.

Pregnancy Tips
TB Affect Pregnancy : वाढत्या टीबीमुळे येऊ शकते वंध्यत्व, कशी घ्याल काळजी? जाणून घ्या डॉक्टरांकडून

3. आल्याचा चहा किंवा आले चाखल्याने उलट्या आणि मळमळपासून आराम मिळतो. तसेच आले, लिंबू आणि मध यांचे डिटॉक्स वॉटर तयार करुन ते पिऊ शकता.

4. शरीरात व्हिटॅमिन बी ६ चा समावेश करा. केळी, पिस्ता यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. ज्यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलटी यापासून सुटका होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com