क्षयरोग (टीबी) फुफ्फुसावर गंभीर परिणाम करतोच, परंतु गर्भाशयात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये देखील क्षयरोग पसरू शकतो. ज्यामुळे गर्भधारणा गुंतागुंत किंवा वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो.
याविषयीची माहिती दिलीये पुण्यातील नोव्हा आयव्हीएफच्या प्रजनन सल्लागार डॉ. रुपाली तांबे. त्या म्हणाल्या की, गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) होणारे क्षयरोगाचे निदान गर्भवती महिलांसाठी आणि बाळासाठीही धोकादायक असू शकते, जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर धोका निर्माण होऊ शकतो. टीबीमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. क्षयरोगामुळे पुरुषांमध्येही प्रजनन समस्या उद्भवू शकतात.
1. क्षयरोग आणि वंध्यत्व यांच्यातील संबंध समजून घेणे
क्षयरोगाने (टीबी) महिलांच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. टीबी प्रजनन अवयवांवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाला संबंधीत दाह आणि गुंतागुंत होऊ शकतात. त्यामुळे फॅलोपियन ट्यूब खराब होण्याची शक्यता असते.
क्षयरोगामुळे या अवयवांमधील ऊतींवर डाग पडू शकतात ज्यामुळे अडथळा निर्माण होऊन प्रजननक्षमतेत अडथळा निर्माण होतो. एंडोमेट्रियल टीबी गर्भाशयाच्या अस्तरांना इजा पोहोचवू शकते ज्यामुळे पातळ एंडोमेट्रियम भ्रूण रोपणासाठी अडथळा निर्माण करतो. यामुळे गर्भाशयाच्या आत चट्टे देखील येऊ शकतात ज्याला आपण अशेरमन्स सिंड्रोम म्हणतो.
गर्भाशयाचा क्षयरोग, ज्याला पेल्विक टीबी देखील म्हणतात, हे प्रामुख्याने गर्भाशयातील जिवाणूंमुळे होते. याचा प्रामुख्याने महिलांवर (women) परिणाम होतो. पुरुषांपेक्षा स्त्रिया या स्थितीला अधिक संवेदनाक्षम असतात, ज्यामुळे गर्भाशयाच्या क्षयरोगाचे प्रमाण जास्त असते.
क्षयरोगावरील उपचार, ज्यामध्ये अनेकदा प्रतिजैविकांचा दीर्घकाळापर्यंत समावेश होतो, टीबीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणारी काही औषधे संप्रेरक (हार्मोन्स) पातळीमध्ये व्यत्यय आणू शकतात किंवा ओव्हुलेशनमध्ये अडचणी निर्माण करु शकतात.
टीबी सारख्या दीर्घकालीन आजाराला सामोरे जाणे हे देखील प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते. गंभीर संसर्गाच्या व्यवस्थापनाशी संबंधित तणाव (Stress) आणि चिंता हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात आणि सामान्य प्रजनन कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकतात.
प्रजनन आरोग्याच्या बाबतीत, क्षयरोगाचे जीवाणू (टीबी बॅसिलस) फॅलोपियन ट्यूबला संक्रमित करतात आणि यामुळे फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. दुसरे म्हणजे, ते गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम करते ज्यामुळे एंडोमेट्रियमचे अस्तर पातळ होते आणि मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. फॅलोपियन ट्यूब्समधील अडथळा आणि एंडोमेट्रियमचे अस्तर पातळ झाल्यामुळे प्रजनन समस्या उद्भवतात.
पुरुषांमध्ये, क्षयरोग (टीबी) हा एपिडिडायमिटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थितीत कारणीभूत ठरतो. जेथे एपिडिडायमिसमध्ये सूज येते, शुक्राणूंच्या वहनासाठी ही ट्यूब जबाबदार असते. शुक्राणू योग्यरित्या बाहेर पडू शकत नसल्यास, प्रजनन समस्या उद्भवू शकतात. एपिडिडायमल टीबी हा फारसा सामान्य नाही आणि सामान्यत: टीबीचा पुरुष प्रजनन प्रणालीवर थेट परिणाम होत नाही.
2. महिला आणि पुरुषांमधील लक्षणे
महिलांमधील लक्षणे - तुमच्या मासिक पाळीतील अनियमितता, रक्तस्रावाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते, अनपेक्षितपणे येऊ शकते किंवा पूर्णपणे बंद होऊ शकते. ठराविक मासिक पाळीच्या वेदनेपेक्षा या वेदना वेगळ्या असू शकतात, यामुळे सतत ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे अस्वस्थता जाणवते जी तुमच्या नेहमीच्या मासिक पाळीच्या चक्रापेक्षा वेगळी असते.
पुरुषांमधील लक्षणे : तुमच्या अंडकोषांमध्ये अस्वस्थता किंवा वाढ जाणवू शकते. हे एक लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. क्षयरोग हे मूळ कारण आहे की नाही हे ठरवण्यासाठी वैद्यकिय सल्ला घ्या.
उपचार: ज्यांना टीबीमुळे वंध्यत्वाची समस्या आहे त्यांनी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आणखी विलंब न करता प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.