चाळीशाव्या वर्षी गर्भधारणा महिलांकरिता आव्हानात्मक ठरु शकते. वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता कमी होते आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते हे ओळखणे महत्त्वाचे आहे. चाळीशीनंतर गर्भधारणेसाठी महिलेला दशकातील स्त्रियांना सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (एआरटी) सारख्या तंत्रज्ञानाची आवश्यकता भासू शकते.
उशीराने होणाऱ्या गर्भधारणेत अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असला तरीदेखील बऱ्याच महिला मागे न हटता या आव्हानांचा सामना करत मातृत्वाची प्रभाव यशस्वीपणे पार पडत असल्याचे दिसून येते.
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या फॉर वुमन अँड चाइल्ड– वरिष्ठ सल्लागार तसेच प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, 9M फर्टिलिटी संचालक डॉ. सुप्रिया पुराणिक म्हणतात, चाळीशीतील गर्भधारणा ही आनंद आणि आव्हाने दोन्ही आणू शकते. आजकाल बऱ्याच स्त्रिया करिअर तसेच उशीराने होणारे लग्न यामुळे गर्भधारणा देखील, या वयात गर्भधारणेमुळे (Pregnancy) उद्भवणारे संभाव्य धोके आणि गुंतागुंत ओळखणे महत्त्वाचे आहे.
वयानुसार प्रजनन क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते आणि चाळीशीनंतर स्त्रीबिजांची संख्या देखील कमी होते आणि स्त्रीबीजाचा दर्जा कमी होतो त्यामुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
चाळीशीतील गर्भधारणेत काही वैद्यकीय गुंतागुंत, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब आणि गर्भातील क्रोमोसोम विकृतींना संबंधित आहे. या टप्प्यावर गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी (Women) संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. अनेक स्त्रिया त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार वैयक्तिक काळजी घेऊन त्यांच्या चाळीशीत यशस्वीरित्या गर्भधारणा करतात.
1. या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
1. अधिकाधिक स्त्रिया उशीराने कुटुंब सुरू करण्याचा पर्याय निवडताना पहायला मिळतात, या वयोगटातील महिलांसाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे गर्भधारणेपुर्व आरोग्याला प्राधान्य देणे. यामध्ये कोणत्याही अंतर्निहित आरोग्य स्थितीचे निराकरण करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक पाऊल उचलणे गरजेचे आहे.
2. फॉलिक ऍसिड, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध निरोगी आहाराचे सेवन करणे हे गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकते.
3. योग किंवा ध्यान यांसारख्या तणाव-कमी करण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्याने देखील गर्भधारणा सुरळीत होण्यास हातभार लावता येतो. चाळीशीनंतर गर्भधारणेच्या इतर गरजा ओळखणे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय पाऊल उचलणे हे जीवनाच्या या टप्प्यावर यशस्वी गर्भधारणेची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढविते.
4. चाळीशीत आई होण्याच्या भावनिक प्रवासादरम्यान कोणतीही भीती किंवा चिंता दूर करण्यासाठी जोडीदार, कुटुंबातील सदस्य किंवा समुपदेशकांशी चर्चा करणे योग्य राहिल.
5. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी आणि अनुवांशिक चाचणी हे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी महत्वाचे आहे. चाळीशीत यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.