Maharashtrian Dadpe Pohe Recipe Dadpe Pohe Recipe in Marathi - Saam Tv
लाईफस्टाईल

Dadpe Pohe Recipe: पोह्यांची ही हटके रेसिपी तुम्ही कधीच ट्राय केली नसेल; एकदा खाऊन तर बघा

Maharashtrian Special Dadpe Pohe Recipe: राज्यात वेगवेगळ्या भागात विविध पद्धतीचे पोहे बनवले जातात. नागपूरचे तर्री पोहे फेमस आहेत. तर काही ठिकाणी गोड पोहे खातात. आज आम्ही तुम्हाला दडपे पोह्यांची रेसिपी सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dadpe Pohe Recipe:

महाराष्ट्रीयन घरात नाश्ता म्हटल्यावर सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे पोहे. पोहे सर्वांनाच आवडतात. प्रत्येक घरात पोह्यांचा नाश्ता असतोच. अनेक ठिकाणी पोहे बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी बटाटा टाकून पोहे करतात. तर काही ठिकाणी पोह्यात टॉमेटोदेखील टाकतात. ओलं खोबरं टाकून पोहे सर्व्ह केले जातात.

नागपूरला तर्री पोहे प्रसिद्ध आहेत. त्यात तर्री दिली जाते. तर काहीजण पोह्यात शेव टाकून खातात. प्रत्येक पोह्याची चव वेगळी लागते. परंतु त्याच त्याच प्रकारचे पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळी तुम्ही दडपे पोहे खाऊ शकता. दडपे पोहे कसे बनवायचे हे अनेकांना माहित नसते. स्वादिष्ट आणि झटपट बनणाऱ्या दडपे पोहे बनवता येतात. त्याचीच रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Recipe News In Marathi)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम्रगी

  • पातळ पोहे

  • बारीक चिरलेला कांदा

  • ओलं खोबरं

  • लिंबाचा रस

  • साखर

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • शेंगदाणे

  • कोथिंबीर

  • हिरव्या मिरच्या

  • मोहरी

  • कढीपत्ता

  • हिंग

कृती

सर्वप्रथम पोहे नारळाच्या पाण्यात भिजवून ठेवाव.

त्यात बारीक चिरलेला कांदा,ओलं खोबरं, मीठ, १ टीपस्पून साखर, शेंगदाणे, लिंबाचा रस मिक्स करा. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.

आता एका कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी द्या. त्यानंतर ही फोडणी पोह्यावर टाकून नीट मिक्स करा.

आता पोहे दहा मिनिटे दडपून वरतून पातेलं ठेवा. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाका. अशाप्रकारचे झटपट होणारे पोहे खूप चविष्ट लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT