केस गळणं ही समस्या आजकाल कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना भेडसावू शकते. आहारात पोषणाची कमतरता, हवामानातील बदल आणि वाढलेला ताण यामुळे केस गळण्याची काही सामान्य कारणं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, काही विशिष्ट व्हिटॅमिन्स आणि खनिजांची कमतरता झाल्यास केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते? चला तर जाणून घेऊया कोणती व्हिटॅमिन कमतरता यामागे कारणीभूत ठरते.
शरीरात आयनची पातळी कमी असल्यास केसांच्या मुळांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. यावर उपाय म्हणून आहारात पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करणे फायदेशीर ठरतो.
व्हिटॅमिन D कमी असल्यास ठिकठिकाणी केस गळणं सुरू होतं. नवीन केसांच्या मुळांची (follicles) वाढ व्हिटॅमिन D मुळे होते. त्याची कमतरता झाल्यास केस विरळ होतात आणि वाढ मंदावू लागते.
झिंकची कमतरता झाल्यास केस अकस्मात गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. आहारात भोपळ्याच्या बिया, सुकामेवा आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश केल्याने झिंकची पूर्तता होते आणि केस निरोगी राहतात.
केसांचा मुख्य घटक ‘केरॅटिन’ हे एक प्रोटीन आहे. प्रथिनांची कमतरता झाल्यास केसांची रचना कमजोर होते आणि ते तुटू लागतात. अंडी, डाळी आणि पनीर यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ आहारात घेतले पाहिजेत.
व्हिटॅमिन B12 हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यावश्यक असतं. या रक्तपेशी केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतात. या व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास केस कमकुवत होतात. आहारात दुग्धजन्य पदार्थ आणि B12 ने समृद्ध केलेले पदार्थ समाविष्ट करावेत.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन E यांची कमतरता झाल्यास स्कॅल्पमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे केसांची वाढ होत नाही. बदाम, अक्रोड, अवोकॅडो यांसारख्या आरोग्यदायी फॅट्सचा आहारात समावेश केल्यास ही कमतरता भरून निघते आणि केस निरोगी राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.