Surabhi Jayashree Jagdish
लिव्हर हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो पचनक्रिया योग्य ठेवण्याचे आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचं कार्य करतं.
जर लिव्हर नीट कार्य करत नसेल, तर शरीरात अनेक गंभीर लक्षणं दिसू लागतात, ज्यांची वेळेत ओळख करणं अत्यंत आवश्यक आहे.
लिव्हर फेल होण्याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे थकवा आणि अशक्तपणा जाणवणं.
त्वचा आणि डोळे पिवळसर होणं म्हणजेच कावीळ हा लिव्हर फेल होण्याचा एक मोठा संकेत आहे.
लिव्हर फेल झाल्यास पोटदुखी आणि पोटात सूज येण्याची समस्या निर्माण होते. पोट फुगल्यासारखे वाटते आणि गॅस, अपचन यांसारख्या तक्रारी वाढतात.
भूक कमी लागणं किंवा अजिबात भूक न लागणं हेही लिव्हर फेल होण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे.
लिव्हरच्या आजारात उलटी आणि मळमळ होण्याची समस्या वाढू शकते. काही वेळा उलटीत रक्तही दिसू शकतं.
लिव्हर खराब झाल्यास पाय आणि टाचा सुजू शकतात. ही समस्या शरीरात पाणी साचण्यामुळे म्हणजेच फ्लुइड रिटेन्शनमुळे उद्भवते.