Turmeric Water Benefits  meta ai
लाईफस्टाईल

Turmeric Water Benefits : सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने काय होतं? डॉक्टरांनी सांगितले 3 महत्त्वाचे फायदे

Raveena Tandon Skin Care : रवीना टंडन रोज सकाळी हळदीचं पाणी पितात. हळदीतल्या कर्क्युमिनने शरीरातली सूज कमी होते.

Sakshi Sunil Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखल्या जातात. वयाच्या ५४ व्या वर्षीही त्यांचा फिटनेस आणि त्वचेवरचा ग्लो अनेकांचं लक्ष वेधून घेतो. त्यामुळे त्यांचा आहार आणि फिटनेस रुटीन जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. एका मुलाखतीत रवीना टंडनने सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम हळदीचं पाणी पित असल्याचं सांगितलं होतं. यासाठी त्या स्वत:च्या फार्मवर पिकवलेल्या सेंद्रिय हळदीचा वापर करतात. हळदीचे पाणी पिण्याची ही सवय आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? याबाबत डॉक्टर सलीम जैदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून काही महत्त्वाचे फायदे सांगितले आहेत.

हळदीचे पाणी पिण्याचे 3 महत्त्वाचे फायदे

1. शरीरातील सूज कमी करण्यास मदत

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे सक्रिय घटक असतात. त्यामध्ये दाहशामक म्हणजेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे शरीरातील सूज आणि दाह कमी होण्यास मदत होऊ शकते. सांध्यांच्या आरोग्यासाठीही हे उपयुक्त ठरू शकते.

2. रोगप्रतिकारशक्तीला आधार

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते. नियमित आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून हळदीचे पाणी घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीला आधार मिळू शकतो.

3. पचनक्रिया सुधारण्यास मदत

अपचन, गॅस आणि पोटात जडपणा जाणवत असल्यास हळदीतील कर्क्युमिन पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी मदत करू शकते. त्याचे दाहशामक गुणधर्म पचनसंस्थेतील सूज कमी करण्यासही सहाय्यक ठरू शकतात.

हळदीचे पाणी कसे तयार करावे?

एक ग्लास पाणी गरम करून त्यात एक चमचा हळद पावडर मिसळा. इच्छेनुसार ताजी किसलेली हळद वापरू शकता. त्यात चिमूटभर काळी मिरी घातल्यास कर्क्युमिनचे शरीरातील शोषण वाढण्यास मदत होऊ शकते.

हळदीचे पाणी कधी प्यावे?

सकाळी हळदीचे पाणी पिण्याची सवय अनेकजण पाळतात. मात्र रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटात जळजळ किंवा अस्वस्थता होत असल्यास ते टाळावे. काही औषधे सुरू असल्यास किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महत्त्वाची सूचना: हळदीचे पाणी हा कोणत्याही आजारावरील उपचार नाही. त्याचे फायदे व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. अतिप्रमाणात सेवन टाळा आणि आरोग्यविषयक समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Overnight Phone Charging: रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवणं योग्य की अयोग्य? बॅटरीवर होतो हा परिणाम!

House Cleaning Tips : जुन्या मोज्यांना फेकून देऊ नका! फरशीवरील केस अन् धूळ साफ करण्याची भन्नाट ट्रिक

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमारांना काढून टाकावं, उद्धव ठाकरे यांची मागणी

मोबाईल फोन स्वच्छ कसा करायचा?

Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष असू द्या! वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून ७५ दिवसांचा ब्लॉक; लोकलसेवेवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT