Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Nanded Turmeric Price : नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला विक्रमी २२ हजार २०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गेल्या नऊ वर्षांतील उच्चांकी दर, दुष्काळाचे संकट, कमी आवक आणि हळदीच्या बाजारभावातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Turmeric Price
Turmeric Pricesaam tv
Published On: 

संजय सुर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीने मागील ९ वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढत मोठी झेप घेतली आहे. नांदेडच्या बाजारात उच्च प्रतीच्या हळदीला प्रति क्विंटल तब्बल २२ हजार २०० रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. काल हळदीला २२ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला होता, तर आजच्या सत्रात प्रति क्विंटल २१ हजार ५०० रुपयांचा भाव नोंदवला गेला. गेल्या ९ वर्षांतील हा सर्वाधिक उच्चांकी भाव मानला जात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये हळदीला १९ हजारांपर्यंतचा भाव मिळाला होता.

भावात अचानक विक्रमी वाढ होण्यामागचे कारण काय?

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हळद लावली खरी, पण पावसाअभावी आणि तीव्र दुष्काळामुळे हळदीचे पीक अपेक्षेप्रमाणे आले नाही. पुढील काळातही हळदीचे उत्पादन येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने बाजारात हळदीची मागणी प्रचंड वाढली आहे, मात्र त्या तुलनेत आवक खूपच रोडावली आहे. यामुळेच शिल्लक हळदीला सोन्यासारखे भाव मिळत आहेत.

Turmeric Price
'कोठडीत तरुणांना इतकं मारलं की एका कानाने ऐकू येईनासं झालं! राहुल गांधींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

पण, या दरवाढीचा फायदा सर्वांना मिळतोय का?

बाजारभावात विक्रमी वाढ झाली असली, तरी याचा प्रत्यक्ष फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांनी गरजेपोटी आपली हळद यापूर्वीच विकली असून, सध्या मोजक्याच शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक आहे. विशेष म्हणजे,

Turmeric Price
मोठी बातमी! भाजप बड्या नेत्याचे हात-पाय बांधले, घरातच बनवलं बंधक; चोरट्यांनी ५० लाखांवर मारला डल्ला

या वर्षाच्या सुरुवातीला हळदीला १२ हजार रुपये भाव होता, तर आठ दिवसांपूर्वी हा भाव १७ हजार रुपयांवर होता. आता मात्र तो थेट २२ हजारांवर पोहोचल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com