Ram Navami 2024 Tithi, Puja Details in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Ram Navami 2024 Muhurt: राम नवमीला २ तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त, याप्रकारे करा Puja; श्रीराम होतील प्रसन्न

Ram Navami 2024 Tithi, Puja Details in Marathi: ज्योतिष शास्त्रानुसार चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते.

कोमल दामुद्रे

Ram Navami 2024 Puja and Vidhi :

ज्योतिष शास्त्रानुसार चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते.

तिथीच्या दिवशी भगवान विष्णूने मानवरुपात रामाचा अवतार घेतला होता. वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामाचा जन्म कर्क राशीत झाला होता. अशा स्थितीत श्रीरामाची जयंती अभिजित मुहूर्तावर साजरी (Celebrate) करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

1. राम नवमी कधी? (Ram Navami Date)

हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी १६ एप्रिलपासून सुरु होते तर १७ एप्रिलला समाप्त होते. उदय तिथीनुसार रामनवमी १७ एप्रिल २०२४ पासून सुरु होईल.

2. तिथी (Ram Navami Tithi)

१६ एप्रिल - दुपारी १. २३ मिनिटांनी नवमी तिथी सुरु होईल

१७ एप्रिल - दुपारी ०३.१४ मिनिटांनी नवमी तिथी संपेल

राम नवमी मुहूर्त - सकाळी ११. १० ते दुपारी ०१.४३ पर्यंत

कालावधी - ०२ तास ३३ मिनिटे

3. रामनवमी पूजा पद्धत (Ram Navami Puja Process)

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा तसेच स्वच्छ कपडे घाला.

  • भगवान रामाच्या (Lord Ram) मुर्तीवर किंवा चित्रावर तुळशीची पाने आणि फुले अर्पण करा. तसेच देवाला फळे अर्पण करा.

  • या दिवशी तुम्ही उपवास करु शकता. आपल्या इच्छेनुसार तुम्ही दानधर्म देखील करु शकता.

  • या दिवशी प्रभू श्रीरामाची आरती करावी. तसेच रामचरितमानस, रामायण, श्री राम स्तुती आणि रामरक्षास्त्रोताचे पठण करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT