Ram Navmi 2024: यंदाचा राम जन्मोत्सव खास, रामनवमीनिमित्त १ लाख ११ हजार १११ किलोंचे लाडू अयोध्येत पाठवणार

Ayodhya Prasad News: संपूर्ण देशभरात रामनवमीचा (Ram Navmi 2024) उत्साह पाहायला मिळत आहे. १७ एप्रिलला संपूर्ण देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे.
One Lakh 111111 Kg Ladoo Prasad Send To Ayodhya On Occasion Of Ram Navami 2024
One Lakh 111111 Kg Ladoo Prasad Send To Ayodhya On Occasion Of Ram Navami 2024Saam Tv

Chaitra Ram Navmi 2024 News

संपूर्ण देशभरात रामनवमीचा (Ram Navmi 2024) उत्साह पाहायला मिळत आहे. १७ एप्रिलला संपूर्ण देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे. अयोद्धेत राममंदिरात भक्तीभावात रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान, रामनवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलो लाडू प्रसादासाठी राममंदिरात पाठवण्यात येणार आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रिपोर्टनुसार, राम मंदिरात रामनवमीच्या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. याचसाठी देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने १ लाख ११ हजार ११ लाडूंचा प्रसाद अयोद्धेत पाठवण्यात येणार आहे. याबाबत ट्र्स्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना यांनी माहिती दिली आहे. देवरा हंस बाबा ट्र्स्टच्या वतीने १,११,१११ किलो लाडूंचा प्रसाद अयोध्येत पाठवण्यात येणार आहे. तसंच लाडूचा प्रसाद दर आठवड्याला देशभरातील विविध मंदिरात पाठवला जातो. तिरुपती बालाजी, काशी विश्वनाथ मंदिर, तिरुपती बालाजी अशा सर्व मंदिरात हा प्रसाद दिला जातो. २२ जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तदेखील ट्रस्टने ४० किलो लाडू वाटले होते.

One Lakh 111111 Kg Ladoo Prasad Send To Ayodhya On Occasion Of Ram Navami 2024
Foods To Avoid After Eating Watermelon: कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे ३ पदार्थ, आरोग्यावर होईल नुकसान

यंदाच्या वर्षी भाविकांमध्ये रामनवमीचा खूप जास्त उत्साह पाहायला मिळत आहे. पाचशे वर्षांनंतर अखेर अयोद्धेत राम मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या रामनवमीनिमित्त अयोद्धेत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्याचे दिसत आहे. तसेच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

One Lakh 111111 Kg Ladoo Prasad Send To Ayodhya On Occasion Of Ram Navami 2024
32 Degrees Of Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांजवळ किती Degrees होत्या? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com