Raksha Bandhan Special Recipe 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Raksha Bandhan Special Recipe 2023 : रक्षाबंधनला बनवा टेस्टी व स्वादिष्ट मखाण्यापासून लाडू, पाहा रेसिपी

How To Make Makhana Ladoo : आरोग्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर रक्षाबंधनला हेल्दी व टेस्टी पदार्थांची चव चाखण्यासाठी मखाण्याचे लाडू ट्राय करु शकता.

कोमल दामुद्रे

Makhana Ladoo Recipe: श्रावण महिन्यातला बहिण भावाचा सगळ्यात आवडता सण रक्षाबंधन. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून ओवाळते. भाऊराया देखील आपल्या लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी तिला हवे तसे गिफ्ट देतो. या नात्याला कोणतीही मर्यादा नसते. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर रक्षाबंधनला हेल्दी व टेस्टी पदार्थांची चव चाखण्यासाठी मखाण्याचे लाडू ट्राय करु शकता.

मखाणे शरीराला पचवण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. यामध्ये असणारे घटक हे उच्च रक्तदाबापासून आराम मिळवण्यासाठी व हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊया मखाण्याचे लाडू बनवण्याची पद्धत

1. साहित्य

  • मखाणा (Makhana) - 1 वाटी

  • भाजलेले शेंगदाणे - 2 टेस्पून

  • गूळ - अर्धी वाटी

  • तूप (Ghee) - २ चमचे

  • काजू - 15-20

  • बदाम (Almond) -10-15

  • पिस्ता -10-15

  • भोपळ्याच्या बिया - 1 टेस्पून

  • तीळ - 1 टीस्पून

  • सुके खोबर - 2 टेस्पून

  • फ्लेक्स बिया - 1 टीस्पून

2. कृती

  • मखाण्याचे लाडू बनवण्यासाठी कढईत गूळ घालून साखरेचा पाक बनवा.

  • आता दुसर्‍या पातेल्यात तूप घालून मखाणा भाजून घ्या आणि सोनेरी झाल्यावर गॅस बंद करा.

  • कढईतून मखाणे काढा आणि त्यात काजू, बदाम, पिस्ता, जवस, तीळ, नारळ, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया तळून घ्या.

  • मिक्सरमध्ये सर्व बारीक करा. लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार करा, यासाठी एका मोठ्या भांड्यात मखाणे आणि व तळून घेतलेल्या गोष्टी एकत्र करा.

  • नंतर त्यात गुळाचे पाक घाला आणि सर्व मिसळा, जेणेकरून लाडू चांगले बनवता येतील.

  • मिश्रण आणि साखरेचा पाक मिक्स केल्यानंतर हाताला तूप लावून छोटे लाडू बनवा. लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा आणि खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT