Shravan Festival Recipe: श्रावणात बनवा मऊ कापसासारखी धागेदार सोनपापडी; तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

Homemade Soan papdi : श्रावण महिन्यात तुम्हाला गोडाचे पदार्थ झटपट बनवले जाणारे पदार्थ खायचे असतील तर तुम्ही सोनपापडी नक्की बनवू शकता.
Shravan Festival Recipe
Shravan Festival RecipeSaam Tv
Published On

Soan Papdi Recipe : श्रावण महिना सुरु झाला की, अनेक गोडाचे पदार्थ चवीने चाखले जातात. सणांच्या वेळी ऑफिस किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना काही द्याचे झाले तर आठवते ती सोनपापडी. सोनपापडी ही दिवाळीच्या काळात बाजारात जास्त प्रमाणात विकली जाते.

श्रावण महिन्यात तुम्हाला गोडाचे पदार्थ झटपट बनवले जाणारे पदार्थ खायचे असतील तर तुम्ही सोनपापडी नक्की बनवू शकता. रक्षाबंधन किंवा येणाऱ्या पुढील सणांमध्ये ही रेसिपी ट्राय करुन पाहा. जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Shravan Festival Recipe
Shravan Special Vrat Recipe 2023: श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नैवेद्यात झटपट बनवा बटाट्याचा हलवा, पाहा रेसिपी

1. साहित्य

  • तूप (Ghee) - 2.5 चमचे

  • मैदा - 1 कप

  • बेसन (Besan) - 1 कप

  • वेलची पावडर-1/3 टीस्पून

  • साखर (Sugar) -1.5 कप

  • पाणी-१/२ कप

  • लिंबाचा रस- 2-3 चमचे

  • बारीक चिरलेली ड्रायफ्रुट्स

Shravan Festival Recipe
Deepa Parab: तुझं असं सौंदर्य पाहून सारं रान झालं हिरवं

2. कृती

  • सर्व प्रथम कढईत तूप टाकून मंद आचेवर गरम करा. लगेच त्यात मैदा आणि बेसन चाळून चांगले तळून घ्या.

  • त्यात वेलची पूड घाला आणि पीठ सोनेरी होईपर्यंत तळा. पीठ जळणार नाही याची काळजी घ्या.

  • पीठ भाजल्यावर गॅस बंद करा. दुसरीकडे एका भांड्यात साखर आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवा.

Shravan Festival Recipe
Satrangi Biryani Recipe : घरच्या घरी ट्राय करा झटपट सोप्या पद्धतीने सतरंगी बिर्याणी, स्वातंत्र्यदिनानिमित्त पाहा स्पेशल रेसिपी
  • त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. साखरेचा तपकिरी होऊन घट्ट होऊ लागली की गॅस बंद करा.

  • मोठ्या प्लेट, ट्रे किंवा पॅनला तूप किंवा बटर लावून ग्रीस करा. त्यात कॅरॅमलाइज्ड साखर घाला आणि चांगली पसरवा. यानंतर स्पॅटुलाच्या मदतीने मळून घ्या.

  • पीठ घट्ट झाल्यावर 10-15 वेळा दुमडून घ्या. अशा प्रकारे सिरप सोनेरी रंगाचे होईल. तयार पीठ मोठ्या थाळीवर पसरुवून घ्या

  • आता त्यात थोडे मैद्याचे मिश्रण 20-22 वेळा 8 च्या आकारात तयारात करा.

  • उरलेले मिश्रण घालून पुन्हा १०-१५ वेळा फोल्ड करा. ते हळूहळू थरांमध्ये मोडण्यास सुरवात करेल. थर वेगळे करा.

  • त्यात ड्राय फ्रूट्स घाला आणि प्लेटमध्ये एक एक करून समान भागांमध्ये ठेवा. त्यांचे तुकडे रॅपर किंवा प्लास्टिक शीटमध्ये गुंडाळा. तुमची सोन पापडी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com