Raksha Bandhan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : बहिणींनो, अजूनही राखी खरेदी केली नाही? 'या' टिप्स करतील मदत, निवडा सुरेख डिझाइन

Rakhi Buying Tips : भावासाठी रक्षाबंधनला राखी खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या. नाहीतर चुकीच्या राखीचा भावावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Shreya Maskar

रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण होय. संपूर्ण वर्ष भावंडे रक्षाबंधन आणि भाऊबीज या सणांची आतुरतेने वाट पाहत असतात. बहिण भावाला या दिवशी राखी बांधून गोड खाऊ घालते. बहिणीने बांधलेली राखी भावाच्या चांगल्या आयुष्याची प्रार्थना असते. तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. भाऊ- बहिणीमध्ये कितीही भांडणे झाली तरी हे प्रेमाच नातं फुलतचं जातं. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन असून अजूनही लाडक्या भावासाठी राखी खरेदी केली नसेल तर,ज्योतिष शास्त्रानुसार राखी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.

राखी खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • राखी खरेदी करताना आकार लक्षात घ्यावा. जास्त मोठ्या आकाराची राखी खरेदी करू नये. यामुळे भावाच्या हाताला त्रास होऊ शकतो. मोठी राखी तुटण्याचा धोका जास्त असतो. तसेच राखी तुटणे हा अशुभ संकेत मानला जात

  • राखीमध्ये काळा रंग नसावा याची काळजी घ्यावी. कारण काळा रंग पूजा साहित्यात अशुभ मानला जातो.

  • ओम लिहिलेली राखी भावाच्या उज्जवल भविष्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे अशी राखी निवडावी.

  • भावासाठी चांदीची राखी बनवणे कधीही चांगले राहील. यामुळे भावाच्या आयुष्यात सुख शांती आणि करिअरमध्ये प्रगती लाभेल.

  • फॅशनच्या नादात कधीही क्रॉस, हाफ वर्तुळ असलेली राखी खरेदी करू नये.

  • फुलं आणि मोत्यांनी भरलेली राखी भावासाठी शुभ मानली जाते.

  • भावाच्या मनगटावर चुकूनही देवी- देवतांचे चित्र असलेली राखीही बांधू नये.

  • राखी खरेदी करताना त्याची मजबूती पाहणे खूप गरजेचे असते. कारण अनेकदा काही वेळातच राखी तुटते किंवा घाणेरडी होते. जे की भावाच्या आयुष्यासाठी अशुभ मानले जाते.

  • लहान मुलांना कितीही आवडत असले तरी त्यांच्यासाठी कार्टूनची राखी खरेदी करू नये.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT