Raksha Bandhan 2024 : भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर आहेत? नो टेन्शन! यंदा अनोख्या पद्धतीने साजरी करा लाँग डिस्टन्स रक्षाबंधन

Long Distance Raksha Bandhan : यंदा रक्षाबंधनला भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर असल्यास डिजिटल स्वरूपात रक्षाबंधन सेलिब्रेशन करू शकता. सिंपल टिप्स फॉलो करा.
Long Distance Raksha Bandhan
Raksha Bandhan 2024 SAAM TV
Published On

उद्या म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. आज बाजारपेठा राखी आणि मिठाईंनी गजबजलेल्या पाहायला मिळत आहेत. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते. अशात यावर्षी तुमची बहीण किंवा भाऊ कामानिमित्त तुमच्या पासून लांब असतील तर, वाईट वाटून न घेता तुम्ही लाँग डिस्टन्स रक्षाबंधन साजरी करू शकता. कशी ते जाणून घ्या. दूर राहूनही तुमचे नाते घट्ट राहील आणि एक अविस्मरणीय क्षण तुम्हाला जगता येईल.

व्हिडिओ कॉल

आजकाल इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावरून आपण व्हिडिओ कॉलच्या साहाय्याने आपल्या प्रियजनांसोबत संपर्क साधू शकतो. यंदा जर तुमचा भाऊ किंवा बहिण तुमच्यापासून दूर राहत असतील तर व्हिडिओ कॉलवर तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन करू शकता. तुमच्या मनातील भावना तुमचे डोळे सांगून जातील. व्हिडिओ कॉलवर तुम्ही बहिणीसोबत डिनर डेट प्लान करू शकता.

सरप्राइज गिफ्ट

तुम्ही तुमच्या लाडक्या बहिण आणि भावासाठी ऑनलाइन गिफ्ट पाठवू शकता. आपल्या भावंडांना आवडणारी वस्तू गिफ्ट करा. दूर राहूनही तुम्ही बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता. तुमचं नाते अधिक घट्ट होईल.

Long Distance Raksha Bandhan
Raksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, 'या' देवांना बांधा राखी, होतील मनोकामना पूर्ण

ऑनलाइन कुरिअर

रक्षाबंधनमध्ये महत्त्वाची असलेली राखी तुम्ही भावाला कुरिअर करू शकता. तसेच त्याच्या आवडीची मिठाई देखील भावाला पाठवू शकता. मिठाई तुम्ही बनवलेली असेल तर भावाला अजून गोड लागेल. दूर राहूनही तुमच्या हाताची चव त्याला चाखता येईल. तसचे तुम्ही ऑनलाइन भावाच्या किंवा बहिणीच्या आवडीचा पदार्थ ऑडर करू शकता.

Long Distance Raksha Bandhan
Raksha Bandhan 2024 : चिमुकल्यांचं पहिलं रक्षाबंधन होईल खास; आयुष्यभर राहील क्षण लक्षात, वाचा संपूर्ण प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com