Dhanshri Shintre
कमी प्रकाशात व्हॉट्सअॅप कॅमेरा असमाधानकारक वाटत असल्यास, लवकरच येणारा नवीन मोड तुमचा अनुभव नक्कीच अधिक चांगला करेल, अशी माहिती समोर आली आहे.
व्हॉट्सअॅप कॅमेऱ्यासाठी "नाईट मोड" नावाचे नवीन फिचर येत असून, यामुळे कमी प्रकाशातही स्पष्ट आणि दर्जेदार फोटो काढता येणार आहेत.
हे नवे नाईट मोड फिचर सध्या Android व्हर्जन 2.25.22.2 बीटा युजर्ससाठी परीक्षणासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
कमी प्रकाशात फोटो काढताना हे फिचर एक्सपोझर आपोआप समसमान करत असल्याने तुम्हाला अधिक स्पष्ट फोटो मिळतील.
अलिकडच्या काळात WhatsApp ने त्यांच्या कॅमेऱ्यात नवीन फिल्टर्स जोडले असून युजर्ससाठी फोटोग्राफीचा अनुभव अधिक आकर्षक केला आहे.
आता फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करताना थेट रिअल-टाईम इफेक्ट्स वापरता येणार असून, पूर्वी ते फक्त व्हिडिओ कॉलसाठी होते.
WABetaInfo च्या अहवालानुसार, काही बीटा युजर्सना WhatsApp च्या कॅमेऱ्यात चंद्रासारखा नवीन आयकॉन दिसत आहे.
या आयकॉनवर क्लिक करून कमी प्रकाशात फोटो घेतल्यास, WhatsApp सॉफ्टवेअर आपोआप फोटोची गुणवत्ता सुधारेल.