ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर व्हॉट्सॲप तुमच्यासाठी एक खास फिचर लवकरच लॉंच करणार आहे. या नवीन फीचरमध्ये तुम्हाला चॅटमध्ये वेव्ह इमोजी मिळणार आहे.
वेव्ह Wave इमोजी हा हात हलवणारा इमोजी आहे. युजर्स ते हॅलो किंवा हाय म्हणून पाठवू शकतात. ज्यांना नवीन कॉनटॅक्टसह चॅट सुरु करायचे आहे हे फिचर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
WABetaInfo ने त्यांच्या x हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये, हा इमोजी अँड्रॉइड 2.25.21.24 साठी WhatsApp बीटामध्ये दर्शवण्यात आला आहे.
ज्या व्यक्तीशी तुम्ही कधीही चॅट केले नाही अशा व्यक्तीचे चॅट उघडल्यावर तुम्हाला हे फीचर दिसेल. त्याच्या चॅटच्या खालच्या बाजूला तुम्हाला हा वेव्ह इमोजी दिसेल.
सध्या हे फीचर व्हॉट्सॲप बीटा युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. बीटा टेस्टींगनंतर, लवकरच सर्व युजर्ससाठी लाँच केले जाऊ शकते.
व्हॉट्सॲप हे इमोजी फक्त चॅट्सपुरते मर्यादित ठेवले नाहीये, तर व्हॉइस चॅट्समध्ये वेव्ह ऑल हा नवीन पर्याय देखील जोडण्यात आला आहे.
हे फिचर ग्रुपमधील सर्व सदस्यांना व्हॉइस चॅटमध्ये सामील होण्यासाठी नोटिफिकेशन पाठवते. सर्वांना मीटिंग किंवा चर्चेसाठी एकत्र बोलावण्याचा हा एक स्मार्ट मार्ग असू शकतो.