Rain is Bad For Health Saam TV
लाईफस्टाईल

Rain is Bad For Health : पावसात भिजण्याची मजा ठरू शकते सजा; करावा लागेल 'या' समस्यांचा सामना

Rain is Bad For Your Hair and Skin : आता तुम्ही देखील असा प्लान केला असेल तर आधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. कारण पावसात जास्त भिजल्याने आपण आजारी तर पडतोच शिवाय केस आणि स्किन देखील खराब होते.

Ruchika Jadhav

पावसाळा प्रत्येकाचा फेवरेट असतो. काही व्यक्ती तर वर्षभर पावसाळा कधी येतो आणि आम्ही मनसोक्त पाण्यात भिजतो याची वाट पाहत असतात. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती ट्रेकिंसाठी तयारीला लागलेत. बाहेर फिरण्यासोबत पावसाच्या पाण्यात भिजत दुचाकीवरून प्रवास करत भिजण्याचा प्लान अनेकजण करतात.

पावसात भिजण्यासाठी काही व्यक्ती तर खास सुट्टीचा एक दिवस निवडतात, आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत फोटोशूट करत भिजत असतात. आता तुम्ही देखील असा प्लान केला असेल तर आधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. कारण पावसात जास्त भिजल्याने आपण आजारी तर पडतोच शिवाय केस आणि स्किन देखील खराब होते.

कोंडा होतो

पावसाच्या पाण्यात जास्त वेळ भिजल्याने स्कॅल्पचे पीएच लेवल बिघडते. यामुळे केसांत malassezia नावाचं फंगल सुद्धा पसरतं. तसेच पावसाच्या पाण्यामुळे केसांत कोंडा जास्त वाढतो. केसांत खाज येणे, जळजळ होणे अशा समस्यांचा सामना कारावा लागतो.

हेअर फॉल

पावसाचं पानी थेट आकाशातून आपल्या डोक्यावर पडतं. हे काही फिल्टर केलेलं पाणी नसतं. त्यामुळे यात काही प्रमाणात बॅक्टेरीआ सुद्धा असतात. तसेच पावसात रस्त्यांवर आणि जमिनीवर पाणी साठून राहतं. हे साठलेलं पाणी सुद्धा आपण मजा-मस्तीमध्ये एकमेकांच्या अंगावर उडवतो. त्यामुळे देखील आपल्या अंगावर बॅक्टेरीआ आणि किटानू उडतात. त्यामुळे केस गळती वाढते. पावसात भिजल्यावर घरी आल्यावर पुन्हा आंघोळ, मॉइश्चराइर, शॅम्पू आणि कंडीशनर करणे देखील महत्वाचे आहे.

स्किन रिअॅक्शन

पावसात भिजत अताना फक्त पावसातील पाणी अंगावर पडल्यास हरकत नाही. मात्र जर तुम्ही रस्त्यावर साठलेलं पाणी अंगावर उडवत असाल तर घरी आल्यावर तुम्ही स्किनवर लाल पुरळ उमटलेले दिसतील. किंवा स्किनवर रॅशेस आलेले दिसतील. त्यामुळे असे पाणी कुणाच्या अंगावर उडवू नका आणि स्वत:वर देखील उडवून घेऊ नका.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT