Makeup Tips : पुरळ आणि ओपनपोर्स असलेल्या स्किनवर कशा पद्धतीने कराल मेकअप, जाणून घ्या

Skin Care Tips : आपण मेकअप करतो त्यावेळी तुमची स्किन व्यवस्थितरित्या तयार असणे अत्यंत गरजेचे आहे.
Makeup Tips
Makeup TipsSaam Tv

Makeup Tips : अनेक व्यक्तींच्या चेहऱ्यावर पुरळ आणि ओपन पोर्स असतात. ज्यामुळे मेकअप करणे अत्यंत चॅलेंजिंग बनते. तुम्ही सुद्धा या समस्येने त्रस्त असाल तर, तुम्हाला तुमच्या स्किन केअर प्रॉडक्ट सोबत कॉस्मेटिक्समध्ये बदल करावा लागेल.

अॅकने प्रोन स्किनला जास्त प्रमाणात स्किन केअरची गरज असते. खास करून जेव्हा आपण मेकअप करतो त्यावेळी तुमची स्किन व्यवस्थितरित्या तयार असणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही मेकअप प्रॉडक्ट खरेदी करायला जातात तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Makeup Tips
Soft And Glowing Skin : त्वचेला सॉफ्ट आणि ग्लोविंग बनवण्यासाठी 'या' गोष्टी नक्की वापरून पहा

तुम्ही नेहमी नॉन कॉमेडोजेनिकचे लेबल असलेले प्रॉडक्ट खरेदी करा. सोबतच जेलबेस आणि ऑइल फ्री मेकअप प्रॉडक्टचा वापर करा. सोबतच तुम्हाला अशा काही खास टिप्स (Tips) शेअर करणार आहोत. जेणेकरून तुमचा मेकअप अतिशय खुलून दिसेल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने मेकअप एन्जॉय करू शकाल.

1. थ्री स्टेप केअर :

मेकअप आधी चेहरा (Skin) क्लिनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी क्लिनिंग करून त्वचेला एक्सफोलीएट करा ज्यामुळे ड्राय आणि डेड स्किन निघून तुमची स्किन मऊ राहील. त्यानंतर त्वचेला हायड्रेट करा. तुम्हाला शक्य होईल तेवढे ऑइल (Oil) फ्री प्रॉडक्टचा वापर करा. असं केल्याने तुमची त्वचा अतिशय मुलायम होईल.

2. प्रायमरचा वापर :

प्रायमर तुमच्या स्किनला मेकअपसाठी तयार करते. प्रायमरचा वापर केल्याने तुमचा मेकअप अधिक काळ टिकून राहण्यासाठी मदत करतो. सोबतच प्रायमरचा वापर केल्याने तुमची स्किन अतिशय मऊ बनते आणि मेकअप केल्यानंतर तुम्हाला एक मऊ बेस मिळतो. तुमची स्किन अॅकने प्रोन असेल तर तुम्ही म्याटीफाइंग प्रायमरचा वापर करू शकता. जेणेकरून तुमचे ओपन पोर्स स्मूथ होतील आणि नाहीसे दिसतील.

Makeup Tips
Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडीचा असा करा उपयोग, त्वचा चमकण्यासोबत वृद्धत्वाचा प्रभावही कमी होईल!

3. फाउंडेशन :

अनेक स्त्रिया त्यांच्या एकने प्रोन स्किन वरती डायरेक्ट हेवी फाउंडेशनचा प्रयोग करतात. परंतु असं करने अत्यंत चुकीचे आहे. सर्वात पहिले प्रॉब्लेमवर टिंटेड मॉइस्चरायझर किंवा कलर कलेक्टरचा वापर करा. त्यानंतर आवश्यक असेल तसे मिडीयम फुल कव्हरेज फाउंडेशनचा वापर करा. असं केल्याने तुमची स्किन जास्त फ्रेश दिसेल.

4. कन्सिलर :

तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि एकने पोर स्कीन लपवण्यासाठी कन्सिलरचा वापर करा. कन्सिलर हे प्रत्येकाच्या स्किन टोन प्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे असते. गोरा वर्ण असलेल्या व्यक्तींसाठी ऑरेंज किंवा येलो रंगाचे कन्सीलर वापरण्यात येते. त्याचबरोबर कृष्णवर्णीय व्यक्तींना डार्क रंगाचे कंसीलर वापरण्यात येते.

Makeup Tips
Skin Glowing Tips : ग्लोविंग त्वचेसाठी फायदेशीर ठरेल तुळशीच्या पानांचा नॅचरल टोनर!

5. ट्रान्सलेशन पावडर :

एकने प्रोन स्कीनवर हेवी मेकअपपेक्षा लेअरिंग मेकअप चांगला दिसतो. कन्सीलर करून झाल्यावर आणि मेकअप बेस डन झाल्यावर तुम्ही ब्रश किंवा पावडर पफच्या सहाय्याने ट्रान्सलेशन पावडर लावू शकता. या पावडरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि ओपन पोर्स दिसेनासे होतील आणि चेहऱ्यावर मॅट फिनिश लूक येइल.

6. मेकअप फिक्सर :

चेहऱ्यावर केलेला मेकअप आणखी खुलून दिसण्यासाठी आणि तुमचा बेस फ्लोलेस दिसण्यासाठी तुम्ही मेकअप फिक्सरचा वापर करू शकता. मेकअप मिक्सरच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अपूर्ण राहिलेल्या मेकअपच्या भागामधील शेवटचा भाग पूर्ण करण्याचे काम मेकअप फिक्सर करते. त्यामुळे तुम्हाला तुमचा मेकअप आणखीन सुंदर बनवायचा असेल तर, तुम्ही मेकअप फिक्सरचा वापर करणे सुरू करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com