Skin Glowing Tips : ग्लोविंग त्वचेसाठी फायदेशीर ठरेल तुळशीच्या पानांचा नॅचरल टोनर!

Basil Leaves Benefits : चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोनर वापरणे अतिशय फायदेशीर असते.
Skin Glowing Tips
Skin Glowing TipsSaam Tv

Basil Leaves For Skin Glowing : चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोनर वापरणे अतिशय फायदेशीर असते. अशातच चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी अनेक व्यक्ती महागड्या टोनरचा वापर करतात. परंतू मार्केटमध्ये मिळणारे टोनर केमिकलयुक्त असतात.

ज्यामुळे त्वचेवर (Skin) त्याचे वाईट परिणाम देखिल पाहायला मिळतात. अशातच तुम्ही तुळशीचे टोनर वापरू शकता. तुळस ही अतिशय गुणकारी असते. सोबतच त्वचेसंबंधितच्या सगळ्या समस्या दूर निघून जातात.

तुळस (Basil) ही अनेक औषधी तत्त्वांनी परिपूर्ण असते. सोबतच तुळशीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टरियल, अँटीइम्प्लेमेंटरी यांसारखे तत्व उपलब्ध असतात. अशातच तुळशीच्या पानांपासून टोनर बनवुन तुम्ही तुमच्या त्वचेसंबंधितच्या समस्यांना कायमचं गुडबाय बोलू शकतात. चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या पानांचे फायदे.

Skin Glowing Tips
Glowing Skin Tips : ग्लोइंग स्किनसाठी प्या 'हे' 7 ज्यूस

तुळशीचे टोनर बनवण्याची पद्धत -

तुळशीचे टोनर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करा. आता तुळशीची पानं धुवून पाण्यामध्ये टाका आणि अर्धा तास पाणी उकळवून घ्या. आता पॅनमधील पाणी एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून घ्या. त्यानंतर या पाण्यामध्ये थोडसं गुलाबजल आणि ग्लिसरीन टाकून मिक्स करा.

तुळशीचे टोनर लावण्याची पद्धत -

तुळशीचे टोनर लावण्याआधी तुमचा चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या. आता चेहरा टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावर आणि मानेवर तुळशीचे टोनर लावून घ्या. टोनर सुकल्यानंतर चेहऱ्यावर मोईश्चरायझर लावायला विसरू नका. आता जाणून घेऊया तुळशीच्या टोनरचे फायदे.

पीएच मेंटेन ठेवण्यासाठी फायदेशीर -

तुळशीच्या टोनरमध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडंट तत्व त्वचेची पीएच लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर निघून जातात. त्याचबरोबर तुमची स्किन पूर्णपणे प्रॉब्लेम फ्री राहते.

स्किनचे ग्लोविंग सिक्रेट -

औषधीय तत्वांनी परिपूर्ण असलेले तुळशीचे टोनर त्वचेला डिटॉक्स करण्याचे काम करते. ज्यामुळे स्किन पोर्समध्ये उपलब्ध असलेल्या बॅक्टेरिया आणि घाण साफ होण्यास मदत होते. सोबतच तुमची स्किन नॅचरल ग्लो करते.

Skin Glowing Tips
Glowing And Healthy Skin : ग्लोइंग व हेल्दी त्वचेसाठी आहारात आज सामील करा या फळांचा !

स्किन टाइटनिंगसाठी फायदेशीर -

तुळशीचे टोनर लावल्याने स्किन टाइटनिंगसाठी मदत होते. यामुळे त्वचेचे ढिलेपण कमी होऊ लागते. सोबतच ओपन पोर्सची समस्या देखील तुळशीच्या टोनरच्या वापराने दूर निघून जाते.

त्वचा राहील हायड्रेट -

त्वचा हायड्रेटर ठेवण्यासाठी तुळशीचे टोनर बेस्ट ऑप्शन मानले जाते. यामध्ये उपलब्ध असणारे गुलाब जल आणि ग्लिसरीन त्वचेमधील मुलायमपणा ठेवण्यासाठी मदत करते. आणखीन चांगल्या रिझल्ट साठी तुम्ही तुळशीच्या टोनरसोबत एलोवेरा जेल, कडुलिंबाची पाने आणि काकडी देखील मिक्स करू शकता.

पिंपल्स दूर निघून जातील -

तुळशीच्या टोनरमध्ये उपलब्ध असणारे अँटिबॅक्टरियल गुणधर्म पिंपल्स येण्यापासून थांबवतात. त्याचबरोबर अँटी फंगल या गुणधर्मामुळे त्वचेवरील बारीक बारीक पुरळ येणे बंद होते. सोबतच दररोज तुळशीचे टोनर वापरल्याने इन्फेक्शनचा खतरा जाणवत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com