Ragi Idli Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Ragi Idli Recipe : मधुमेहाला कंट्रोल करेल नाचणीची इडली, अशाप्रकारे बनवा परफेक्ट रेसिपी

Diabetes Food : नाचणीपासून बनवलेली इडली आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

कोमल दामुद्रे

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांना नेहमीच खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते. अशातच कोणत्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे देखील पाहावे लागते. नाचणीपासून बनवलेली इडली आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सकाळच्या नाश्त्यासाठी नाचणी इडली ही एक परिपूर्ण खाद्यपदार्थ असू शकते.

नाचणीमध्ये भरपूर पोषक असतात आणि त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण नियंत्रित ठेवता येते. नाचणी इडली खाल्ल्यानेही चरबी कमी होण्यास मदत होते. नाचणी इडली हेल्दी असण्यासोबतच चवदार देखील आहे. सकाळचा नाश्ता उर्जेने भरलेला असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला (Family) उत्साही ठेवण्यासाठी नाचणीची इडली देखील बनवू शकता.

नाचणी इडली बनवायला सोपी आहे आणि ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. हे दिवसा स्नॅक म्हणून देखील दिले जाऊ शकते. नाचणीची इडली मुलांच्या टिफिनमध्येही ठेवता येते. जर तुम्ही नाचणी इडलीची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल, तर आजच ट्राय करा

साहित्य

  • १ कप- नाचणी पीठ

  • रवा - १ कप

  • आंबट दही - १ कप

  • खाण्याचा सोडा - १/४ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • पाणी (Water) - १ कप

कृती

  • जर तुम्हाला नाश्त्यासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक नाचणी इडली बनवायची असेल तर सर्वप्रथम एका कढईत रवा टाकून मध्यम आचेवर २-३ मिनिटे कोरडा भाजून घ्या.

  • यानंतर, ते एका मोठ्या भांड्यात काढा आणि थंड होऊ द्या. रवा थंड झाल्यावर त्यात नाचणीचे पीठ घालून दोन्ही चांगले मिक्स करावे.

  • नाचणी आणि रव्याचे प्रमाण नेहमी सारखे ठेवा. आता दही आणि चवीनुसार मीठ घालून चमच्याच्या मदतीने मिक्स करा.

  • आता तयार मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवा. ठराविक वेळेनंतर मिश्रण घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून पीठ तयार करा.

  • आता त्यात चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा. यानंतर इडलीचे भांडे घ्या आणि त्याच्या सर्व खणांमध्ये तेल लावा.

  • यानंतर सर्व खणांमध्ये तयार इडली पिठात घाला. आता इडली मध्यम आचेवर १० मिनिटे वाफवून घ्या.

  • यानंतर, भांडे उघडा आणि इडली व्यवस्थित शिजली आहे की नाही ते तपासा. इडली शिजल्यावर भांडे उतरवून ५ मिनिटे ठेवा.

  • यानंतर त्यामधून एक एक करून सर्व इडल्या काढा. त्याचप्रमाणे सर्व पिठातून नाचणीची इडली बनवा.

  • चविष्ट आणि आरोग्यदायी नाचणी इडली नाश्त्यासाठी तयार आहे. नारळाची चटणी आणि सांबार सोबत सर्व्ह करता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT