लोणचं प्रत्येक व्यक्तीला आवडतं. आवडीची भाजी नसल्यास अनेक व्यक्ती लोणचं आणि चपाती खातात. खिचडी भात किंवा डाळ भातावर तूप तसेच लोणचं टाकून खाणे बऱ्याच जणांना आवडतं. पूर्वी प्रत्येक घराघरात लोणचं बनवलं जायचं. वर्षभराचं लोणचं उन्हाळ्याच्या दिवसात एकदाच बनवून ठेवले जायचं. हे लोणचं वर्षभर टिकायचं. मात्र आता अनेक व्यक्ती बाहेरून दुकानातील लोणचं घेऊन येतात. बाहेर बनवलेले लोणचं आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतं.
अनेक व्यक्तींना बाहेर बनवलेले लोणचं खाल्ल्याने घशाचे त्रास होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झणझणीत मिरचीचं चटपटीत लोणचं कसं बनवतात याची रेसिपी सांगणार आहोत. हे लोणचं अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतं. तसेच महिनाभर तरी चांगलं टिकतं. चला तर मग साहित्य आणि रेसिपी जाणून घेऊ.
बारीक मिरच्या पाव किलो
अर्धी वाटी तेल
एक चमचा हिंग
एक चमचा आमचूर पावडर
एक चमचा धना डाळ
पाव चमचा कश्मीरी लाल मिरची
सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल घ्या. तेलामध्ये हिंग टाका. हिंगाचा मस्त वास आला की त्यामध्ये आमचूर पावडर मिक्स करा. तसेच यात धना डाळ देखील मिक्स करून घ्या. त्यानंतर या तेलात कश्मिरी लाल मिरची टाका. तेलातील हा मसाला छान परतून घ्या. तसेच थोडा वेळ सर्व मसाले आणि धना डाळ भाजू द्या.
तोपर्यंत सर्व मिरच्या कापून घ्या. तसेच मिरच्यांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात मीठ टाका. त्यानंतर तयार मसाल्यामध्ये देखील तुमच्या आवडीनुसार मीठ मिक्स करा. तसेच या मिरच्या तयार फोडणीमध्ये टाकून द्या. सर्व मिश्रण छान एकजीव करून परतून घ्या. लोणचं बनवण्यासाठी तेलाचा जास्त वापर केला जातो. तुम्ही पाव किलो मिरच्या वापरत असाल तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात तेलाचा वापर करा. अशा पद्धतीने तयार झालं झटपट मिरचीचे लोणचं. लोणचं बनवण्यासाठी वापरली जाणारी मिरची बारीक असते. तसेच ही मिरची जास्त प्रमाणात तिखट नसते.
मिरची जरी तिखट असली तरी देखील आमचूर पावडरमुळे यातील तिखटपणा कंट्रोलमध्ये राहतो. तुम्ही घरातील छोट्या काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता. मिरचीचं बनवलेलं हे झटपट लोणचं अगदी महिनाभर चांगलं राहतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.