Rose Petals Benefits: विविध गुणांनी समृद्ध गुलाबाच्या पाकळ्या; केसांपासून त्वचेपर्यंत अनेक आजार होतील बरे

Gulab Benefits in Marathi: गुलाबाच्या पाकळ्या ब्युटी ट्रिटमेंटमध्ये स्किन आणि हेअरसाठी फार फायदेशीर आहेत. यामध्ये जास्तप्रमाणात व्हिटॅमीन आणि ऑक्सिडेंट असते.
Rose Petals Benefits: विविध गुणांनी समृद्ध गुलाबाच्या पाकळ्या; केसांपासून त्वचेपर्यंत अनेक आजार होतील बरे
Benefits Of Rose PetalsSaam TV
Published On

गुलाबाच्या पाकळ्या हर्बल मेडिसिन म्हणून वापरल्या जातात. गुलाबाच्या पाकळ्या ब्युटी ट्रिटमेंटमध्ये स्किन आणि हेअरसाठी फार फायदेशीर आहेत. यामध्ये जास्तप्रमाणात व्हिटॅमीन आणि ऑक्सिडेंट असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या घराबाहेर गुलाबाचे एक छोटे झाड तरी असले पाहिजे.

Rose Petals Benefits: विविध गुणांनी समृद्ध गुलाबाच्या पाकळ्या; केसांपासून त्वचेपर्यंत अनेक आजार होतील बरे
Rose Tea For Weight Loss : प्रेमाचं प्रतिक गुलाब तुमचं सौदर्यही वाढवेल, वजन कमी करण्यासाठी कसा वापर कराल? जाणून घ्या

गुलाबाच्या पाकळ्यांचे आयुर्वेदात इतके जास्त फायदे आणि उपयोग आहेत की अनेक व्यक्तींना याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे आज आपण गुलाबाच्या पाकळ्यांबाब अधिक उपयोग आणि फायदे जाणून घेणार आहोत.

चेहरा स्वस्छ करण्यासाठी उपयुक्त

गुलाबाच्या पाकळ्या नॅचरल क्लिन्जरचं काम करतात. कच्च्या दूधाची पावडर आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्याचे आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. चेहऱ्याचा ग्लो आहे त्याहून जास्त वाढतो. गुलाबाच्या पाकळ्या एक प्रकारे क्लिन्जर आणि टोनर म्हणून देखील काम करतात.

केसांसाठी उपयुक्त

गुलाबाच्या पाकळ्या आपल्या केसांसाठी सुद्धा फार उपयुक्त आहेत. त्यामुळे केसांत होणारं डँड्रफचं प्रमाण कमी होतं. केसांना नॅचरल ऑइल मिळतं. गुलाबाच्या पाकळ्यांमुळे स्कॅल्पची पीएच लेवल सुद्धा मेनटेन राहते. यामुळे केसांची वाढ फार छान होते. तुम्ही दररोज आठवड्यातून एकदा स्कॅल्पला गुलाबाच्या पाकळ्यांचा मसाज कराल तर पांढरे केस सुद्धा काळे होण्यास मदत होईल.

पदार्थाची चव वाढते

गुलाबाच्या पाकळ्या विविध पदार्थांची देखील चव वाढवतात. पदार्थांची चव वाढवण्यासाठी तुम्ही मिठाईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद, गुलाबपाणी मिक्स करू शकता. याने मिठाई किंवा त्या गोड पदार्थाला गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध सुद्धा उतरतो. यामुळे मिठाईची चव आणखी जास्त वाढते.

मानसिक स्वास्थ सुधारते

गुलाबाच्या पाकल्या अंघोळीच्या पाण्यात घेतल्या तर त्याने एग्जायटी, डिप्रेशन, इनसोम्निया, चक्कर येणे, पोट दुखी या समस्यांवर थोडी मात मिळते. महिलांनी पिरीएड्सच्या काळात अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या वापराव्यात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. या माहितीचा आम्ही दावा करत नाही.

Rose Petals Benefits: विविध गुणांनी समृद्ध गुलाबाच्या पाकळ्या; केसांपासून त्वचेपर्यंत अनेक आजार होतील बरे
Expensive Rose: अबब! एका गुलाबाची किंमत कोटींहून अधिक; १५ वर्षातून एकदाच फुलतं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com