Chakali Recipe : दिवाळीला घरच्याघरी बनवा स्वादिष्ट कुरकुरीत चकली; 'या' टिप्सने रेसिपी अजिबात चुकणार नाही

Diwali Special Chakali Recipe : भाजणीची परफेक्ट चकली कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज जाणून घेणार आहोत.
Diwali Special Chakali Recipe
Chakali RecipeSaam TV
Published On

दिवाळीमध्ये तुमच्या घरी देखील विविध गोड पदार्थ बनवून तयार असतील. दिवाळीत सारखं गोड खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे अनेक जण चकली आणि चिवडा यावर ताव मारतात. चकली बनवणे तितकेसे कठीण नाही. मात्र अनेक महिलांना परफेक्ट आणि जाळीदार चकली बनवता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घरच्याघरी चकली कशी बनवायची त्यासाठी किती आणि कोणकोणते साहित्य लागते याची माहिती जाणून घेणार आहोत.

Diwali Special Chakali Recipe
Dink Cha Ladoo Recipe: हिवाळ्यात सांधेदुखी-गुडघेदुखीचा त्रास होतोय? घरच्या घरी बनवा पौष्टिक डिंकाचा लाडू, पाहा रेसिपी

साहित्य

5 वाटी रेशन तांदूळ

2 वाटी चना डाळ

1 वाटी उडीद डाळ

1 वाटी जाड पोहे

1/2 वाटी मूग डाळ

1/2 वाटी साबुदाणा

पाव वाटी जिरे आणि धने

कृती

सर्वात आधी एक जाड कढई घ्या. कढई तापली की त्यात 5 वाटी रेशन तांदूळ, 2 वाटी चना डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी जाड पोहे, 1/2 वाटी मूग डाळ, 1/2 वाटी साबुदाणा

पाव वाटी जिरे आणि धने मस्त भाजून घ्या. सर्व साहित्य छान भाजून झालं की एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर हे साहित्य थंड होऊ द्या. साहित्य भाजत असताना सर्व गोष्टी एकदाच कढईत घ्यायच्या नाहीत. एक एक साहित्य भाजून घ्यायचे आहे.

सर्व धान्य भाजल्यावर चक्कीतून जाडसर पीठ दळून घ्या. त्यानंतर तुम्हाला चकली बनवायची असेल तेव्हा एक वाटी पिठात आर्धी वाटी पाणी मिक्स करा आणि पिठाला मस्त उकड काढून घ्या. तसेच उकड काढताना यात तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ मिक्स करा.

पिठाला उकड काढली की पुढे हे पीठ थोडे तेलाचा हात घेऊन मळून घ्या. पीठ तुम्हाला अगदी मऊ आणि बारीक मळून घ्यायचे आहे. पीठ मळून झाले की पुढची प्रोसेस सर्वांना जास्त कठीण वाटते ती म्हणजे चकली बनवणे. कारण साजा वर्षभर वापरलेला नसतो त्यामुळे चकली बनवताना हात अगदी धुखून येतात. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे तुम्ही चकलीच्या साचला 2 दिवस आधी पासून तेल लावून घ्या. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही साचात पीठ भरल तेव्हा तेव्हा साचाला तेल लावून घ्या. असे केल्याने चकली बनवणे सोपे जाते.

चकली जास्त वेळ बनवून ठेवू नका. ती लगेच तळून घ्या. कारण चकली नंतर जास्त कडक होते. चकली तळताना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे गॅस मंद आंचेवर ठेवा. अनेक महिला गॅस जास्त फास्ट ठेवतात. मात्र असे केल्याने चकली वरून भाजते आणि आतून कच्ची राहते. अशा पद्धतीने तयार झाली झटपट चकली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही चकली नक्की आवडेल.

Diwali Special Chakali Recipe
Sweet Potato Chakli : उपवासाला रताळ्यापासून बनवा कुरकुरीत चकली, मिनिटांत होईल फस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com