Shreya Maskar
उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर रताळ्यापासून कुरकुरीत , खमंग चकली बनवा.
रताळ्याची चकली बनवण्यासाठी रताळी, वराईचे तांदळाचे पीठ, हिरव्या मिरची, आल्याचा तुकडा, मीठ, जिरे आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
रताळ्यापासून चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्या.
उकडलेल्या रताळी सोलून किसून घ्या.
किसून ठेवलेल्या रताळ्यात वराईच्या तांदळाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि जिरे घालून पेस्ट तयार करून घ्या.
या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून छान एकत्र करून घ्या.
तयार झालेले सर्व मिश्रण चकली पात्रात टाकून चकल्या पाडून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून मंद आचेवर खरपूस चकल्या तळून घ्या.
अशाप्रकारे खमंग, कुरकुरीत रताळ्याची चकली तयार झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.