Shreya Maskar
सध्याच्या जीवनात कामाचा ताण, थकवा, अशक्तपणा, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर या सर्वांमुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य कमकुवत होते. अशात शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी रोज दूधात मखाना, खारीक घातलेले ड्रिंक प्या.
खारीकमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहतात.
दुधातील पोषक घटक मेंदूची शक्ती आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत करतात.
दुधात खारीक घालून प्यायल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
मखाना त्वचा आणि केस हेल्दी ठेवण्यास मदत करतो.
खारीक दुधात टाकून प्यायल्याने कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.
खारीक आणि मखाना दूध तयार करण्यासाठी खारीक दुधात १ ते २ तास भिजत ठेवा.
आता दूधात खारीक आणि मखाना टाकून मिक्सरला छान वाटून घ्या.
यामध्ये आवश्यकतेनुसार मध आणि अश्वगंधा घाला. अशाप्रकारे तुमचे प्रोटीनयुक्त हेल्दी ड्रिंक तयार झाले.
प्रवासात नियमित या ड्रिंकचे सेवन केल्यास थकवा दूर होतो. तसेच पोटही भरलेले राहते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.