Peel Peas Effortlessly with These Simple Steps Saam
लाईफस्टाईल

१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

Peel Peas Effortlessly with These Simple Steps: हिवाळ्यात हिरवे वाटाणे बाजारात जास्त प्रमाणात मिळतात. पण हिरवे वाटाणे सोलण्याचे काम किचकट वाटते. हिरवे वाटाणे सोलण्याची पाहा सोपी ट्रिक.

Bhagyashree Kamble

हिवाळ्याच्या काळात बाजारपेठ हिरव्या भाज्यांनी भरलेली असते. या हंगामात वाटाणे देखील मुबलक प्रमाणात विकले जातात. हिरवे वाटाणे हे चविला स्वादिष्ट तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिवाळ्यात वाटाणे खायला हवे. याचे आपण विविध पदार्थ करू शकता. हिवाळ्यात हिरवे वाटाणे स्वस्त असल्याकारणाने आपण जास्त प्रमाणात खरेदी करतो. मात्र, हिरवे वाटाणे सोलताना नाकीनऊ येतात.

हिरवे वाटाणे सोलणे हे कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम मानले जाते. काही लोक सोललेले वाटाणे खरेदी करतात. मात्र, फ्रोजन वाटाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेलच असे नाही. फ्रोजन वाटाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जर आपल्यालाही वाटाणे सोलणे हे कंटाळवाणे काम वाटत असेल तर, काही किचन टीप्स फॉलो करू पाहा. या टीप्समुळे झटक्यात अगदी १० मिनिटांत वाटाणे सोलून बाहेर निघतील.

हिरवे वाटाणे सोलण्यासाठी सोपे टीप्स

स्टेप-१: एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. भांडं गॅसवर ठेवा.

स्टेप-२: पाणी गरम झाल्यावर त्यात वाटाणे टाका.

स्टेप-३: गरम पाण्यात वाटाणे सुमारे ३ ते ५ मिनिटे राहुद्या.

स्टेप-४: ३-५ मिनिटांनंतर वाटाणे ताबडतोब गरम पाण्यातून काढा. एका भांड्यात थंड पाणी घ्या. त्यात बर्फ टाका.

स्टेप-५: थंड पाण्यात वाटाणे घाला. २ मिनिटे पाण्यात वाटाणे ठेवा. २ मिनिटानंतर वाटाण्याच्या साली बऱ्यापैकी मऊ झाल्या असतील.

स्टेप-६: वाटाण्यांना मागून हलके दाबल्याने वाटाणे सहज बाहेर येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

Blood Pressure: थंडी वाढली की रक्तदाबाचा धोका वाढतो, वेळीच व्हा सावध; तज्ज्ञांना महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपुरात दाखल, शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बॅग

SCROLL FOR NEXT