Digestive Tips Saam TV
लाईफस्टाईल

Digestive Tips : तुम्हालाही पोटात गॅस होण्याच्या समस्या आहेत? मग रात्री चुकूनही डाळ-भात खाऊ नका, वाचा कारण

Do not consume pulses at night : अनेक घरांमध्ये रात्रीचा डाळ भाताचा बेत फिक्स असतो. मात्र तुम्हाला माहितीये का? डाळी पचणासाठी हेवी असतात. पचन न झाल्याने पोटात गॅसची समस्या निर्माण होते.

Ruchika Jadhav

रात्री झोपण्याआधी आपण जे खातो त्यावर आपली पचनक्रिया अवलंबून असते. अनेक व्यक्ती दिवसभर चपाती आणि भाकरीचे सेवन करतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात ते डाळ आणि भात खाणे पसंत करतात. अनेक घरांमध्ये रात्रीचा डाळ भाताचा बेत फिक्स असतो. मात्र तुम्हाला माहितीये का? डाळी पचणासाठी हेवी असतात. पचन न झाल्याने पोटात गॅसची समस्या निर्माण होते.

रात्री डाळ-भात खाणाऱ्या व्यक्तींसाठी ही माहिती फार महत्वाची आहे. कारण आम्ही यामध्ये कोणकोणत्या डाळी पचनासाठी जड आहेत त्याची माहिती दिली आहे. चला तर त्या डाळींची नावे जाणून घेऊ.

चणा डाळ

चण्याची डाळ सर्वांना खायला आवडते. यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असते. त्यामुळे ही डाळ लवकर पचत नाही. रात्रीच्या जेवणात चण्याच्या डाळीची आमटी किंवा काही पदार्थ खाल्ल्याने अनेक व्यक्तींना सकाळी गॅसची समस्या जाणवते. तसेच दिवसभर पोट जड राहते.

उडिद डाळ

काळी किंवा सफेद उडिद डाळीची चव अन्य डाळींपेक्षा फार वेगळी असते. ही डाळ आरोग्यासाठी गरम असते. तसेच यातील हाय व्हिटॅमीन आपल्या पचनाच्या समस्या वाढवतात. तुम्ही देखील आहारात या डाळीचं सेवन करत असाल तर दिवसभारत कधीही करा. मात्र रात्रीच्या जेवणात ही डाळ खाऊ नका. त्याने पोट साफ होत नाही. काही व्यक्तींना यामुळे पोटदुखीच्या समस्या देखील होतात.

राजमा

राजमामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं. त्यामुळे राजमा दुपारच्या जेवणात खाणे उत्तम. रात्री राजमा खाऊ नये.

मुग डाळ

मुगाच्या डाळीमध्येही जास्त फायबर असते.यामुळे आपली पचन क्रिया स्लो होते. तसेच गॅसच्या समस्या वाढतात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही डाळींच्या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

SCROLL FOR NEXT