Vishal Gangurde
शरीरातील अनेक आजारांची सुरुवात पोटापासून होते. पोटदुखीमुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या आजारापासून मुक्तता मिळविण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. लिंबू पाणीमुळे पचनसंस्था सुरळीत होते. लिंबू पाण्यामुळे पोटातील गॅसची समस्या कमी होते.
जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोट आणि पचन चांगले राहते. पोटात होणाऱ्या गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
जिरं पाण्यासाठी दोन कप पाण्यात एक चमचा जिरं टाकून उकळावे. त्यानंतर पाणी उकळून गाळावे आणि कोमट प्यावे.
चहा आणि कॉफीमध्ये अधिक प्रमाणात कॅफिनचे प्रमाण अधिक असते. त्याने शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते. ग्रीन टीमुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या कमी होते.
आल्याचा चहामध्ये अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात. या चहामुळे पोटासंबंधित समस्या दूर होतात. तसेच गॅसची समस्या देखील दूर होतात.
ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि गॅसची समस्या त्वरित कमी होते. ओवा कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने गॅसची समस्या कमी होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टीव्ही अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Next : जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम करताय? वेळीच सावध व्हा, होतील गंभीर आजार