Vishal Gangurde
बराच वेळ एका जागी बसून काम केल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतात.
जास्त वेळ एकाच जागी काम केल्याने वजन वाढू शकतं. वाढत्या वजनामुळे अनेक आजार निर्माण होतात.
जास्त वेळ एकाच बसून काम केल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकसह हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार वाढू शकतात.
जास्त वेळ एका ठिकाणी काम केल्याने पाठ वाकणे, मणक्याचा त्रास सुरु होतो. यामुळे काम करताना ताठ बसणे गरजेचे आहे. यामुळे शरीराचा आकारही खराब होतो.
एकाच जागी जास्त वेळ काम केल्याने टाइप २ मधूमेहाचा धोका वाढतो.
एका जागी जास्त वेळ काम केल्याने पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी या सारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकतं.
मानसिक आजार
एका जागी बसून जास्त काम केल्याने मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे व्यक्तीला नैराश्य आणि तणाव वाढू शकतो.
तुम्ही बैठे काम करत असाल तर आयुर्मान कमी होऊ शकतं. आजारापासून दूर राहायचं असेल. तर चालणे, विश्रांती घेणे , योग करणे यांसारख्या गोष्टी करणे गरजेचे आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टीव्ही अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.