Vishal Gangurde
सध्या वातावरणात उकाडा कमालीचा वाढला आहे.
उन्हापासून सुटका करण्यासाठी अनेक जण थंड पाणी पितात.
अनेकांना उन्हातान्हातून आल्यानंतर तातडीने फ्रिजमधून थंड बॉटल काढून पाणी पिण्याची सवय असते.
उन्हातून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने शरीरारा आराम मिळतो आणि उष्णता दूर होते. मात्र, अती थंड पाणी प्यायल्याने गंभीर दुष्पपरिणाम होतात.
उन्हाळ्यात अती थंड पाणी प्यायल्याने थेट मेंदूवर परिणाम होतो. तुम्हाला डोकेदुखी आणि सायनसचा त्रास होऊ शकतो.
अती थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, घशामध्ये वेदना होणे इत्यादी त्रास जाणवतो.
अती थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोट जड होते, पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते.
अती थंड पाणी प्यायल्याने मळमळ होते
अती थंड पाणी प्यायल्याने मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या देखील होता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टीव्ही अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.