ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. इथल्या पदार्थांची नावं ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं.
मसाला डोसा हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. जे तांदूळ आणि डाळीच्या मिश्रणातून बनवले जाते नारळाची चटणी आणि सांबार सोबत खाल्लं जातं.
इलनीर पायसम दक्षिण भारतीय गोड खीर आहे. नारळाच्या पाण्यात तांदूळ आणि साखर मिसळून ते तयार केले जाते. या खीरमध्ये दूध वापरले जात नाही.
पोंगल दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. हा गोड भात तांदूळ, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून ते तयार केला जातो. सहसा ते मातीच्या भांड्यात उघड्या आगीवर शिजवले जाते.
बीसी बेले भात कर्नाटकचे आवडते आणि पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ, तूर डाळ, भाज्या आणि मसाले घालून बनवले जाते. याच्यासोबत रायता, बुंदी, कोशिंबीर, चटणी, पापड दिले जाते.
रसम दक्षिण भारतीय पदार्थ जे एकदा का तुम्ही याचा आस्वाद घेतला तर तुम्ही सर्व गोष्टी विसरून जाल. टोमॅटो, चिंच आणि काळी मिरीपासून रसम बनवली जाते. हे सहसा भाताबरोबर खाल्ले जाते.
मेदू वडा तळलेला पदार्थ आहे. तुम्ही नाश्त्यात बनवू शकता. या वड्यासोबत नारळाची चटणी आणि सांबार खाऊ शकता.
अप्पम केरळची प्रसिद्ध डिश आहे. हे खायला खूप चविष्ट असते. हे नारळाचे दूध आणि कुर्मा सोबत खाल्ले जाते. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात या पदार्थाचा आस्वाद घेतला पाहिजे.