Smartwatch Saam Tv
लाईफस्टाईल

Smartwatch : 900 रुपयांत मिळते जबरदस्त स्मार्टवॉच! 5 दिवसांच्या बॅटरी लाइफसह पाहा इतर फीचर

New Smartwatch Launch : नुकतच pTron कंपनीने नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

pTron Smartwatch

सध्या सगळ्यांमध्येच स्मार्टवॉचची क्रेझ पाहायला मिळत आहे. गरजेसोबतच फॅशन म्हणून स्मार्टवॉच घालतात. स्मार्टवॉच हा सध्याचा ट्रेंड बनला आहे. नुकतच pTron कंपनीने नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे वॉच नवीन वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.

pTron च्या या नवीन वॉचला pTron Reflect Callz नावाने ओळखले जाते. यामध्ये तुम्हाला बिल्ड इन गेम्स आणि 1.85 इंच एचडी डिस्पले सारखे फिचर्स देखील दिले आहेत. विशेष म्हणजे, या स्मार्टवॉचची किंमत एक हजारापेक्षा कमी आहे.

आजकाल सर्वजण डिजिटल झाले आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या साधनांची मागणी वाढली आहे. अनेक कपन्यांनी या ट्रेंडसोबत नवीन वॉच बाजारात आणले आहे. त्यातील एक म्हणजे pTron Reflect Callz आहे. हे स्मार्टवॉच मेटॅलिक आणि सिलिकॉनच्या पट्ट्यांसह येते.

किंमत

pTron च्या या नवीन वॉचची किंमत फक्त ८९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच तुम्ही Amazon वरुन खरेदी करु शकता. हे स्मार्टवॉच ब्लॅक, सिलव्हर आणि गोल्ड अशा तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.

pTron Reflect Call स्पेसिफिकेशन

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या स्मार्टवॉचमध्ये 1.85 इंच एचडी डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये तुम्हाला फिटनेस ट्रॅकरपासून मनोरंजनपर्यंत अनेक फिचर्स आहेत. या स्मार्टवॉचची बॅटरी ५ दिवसांपर्यंत चालते. तर १५ दिवसांपर्यंत स्टँडबाय देते. याशिवाय या वॉचमध्ये मल्टी स्पोर्टस मोड आणि अनेक ट्रॅकर्स उपलब्ध आहे. यात हर्टबीट्स मॉनिटर, स्लीप ट्रॅकर , डेली अॅक्टिव्हिटी ट्रॅकर , रक्तदाब असे अनेक फिचर्स देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT