ITR Filling News: कंपन्यांसाठी आनंदाची बातमी! आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवली

ITR Deadline : सरकारने आयटीआरसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ITR News
ITR NewsSaam Tv
Published On

ITR Filling Deadline

इन्कम टॅक्स अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. परंतु सरकारने आता आयटीआरसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांसाठी आयटीआर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे. कंपन्यांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

याचसोबत, ज्या कंपन्यांना ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ही तारीख ३० ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनुसार, २०२३-२४ साठी फॉर्म ITR-7 मध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर ते ३० नोंव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ITR News
Gold Silver Rate (20th September): सोन्याच्या वाढत्या दराला ब्रेक! चांदीचा भाव कोसळला, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या!

२०२३-२४ वर्षात सप्टेंबरपर्यंत केवळ कर संकलन २३.५१ टक्क्यांनी वाढून ८.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. कपंन्यांनी अधिक आगाऊ कर भरल्याने ही वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे. या कालावधीत कर भरणा २१% वाढला आहे.

या वर्षाच्या १८.२३ लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार ४७.४५ टक्के निव्वळ कर संकलन झाले आहे. गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष कर संकलन १६.६१ लाख झाले होते. आगाऊ कराचा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती.

मंत्रालानुसार, १६ सप्टेंबरपर्यंत ८,६५,११७ कोटी रुपयांच्या कर संकलनात कॉर्पेरेट आयकर आणि सिक्युरीटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये ४,१६,२१७ रुपयांचा समावेश आहे. वैयक्तिक आयकरमध्ये ४,४७,२९१ कोटींचा समावेश आहे.

सरकारने कंपन्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. आयकर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली असून कंपन्यांना ऑडिट तयार करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळणार आहे.

ITR News
World Alzheimer’s Day 2023 : अल्झायमर दिवस का साजरा करतात? जाणून घ्या महत्त्व आणि थीम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com