Navpancham Rajyog saam tv
लाईफस्टाईल

Navpancham Rajyog: ३० वर्षांनंतर बनतोय पॉवरफुल नवपंचम राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार नवी नोकरी अन् पैसा

Navpancham Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि बुधासोबत नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी गोचरमुळे अनेकदा शुभ योगांची निर्मिती होते. येत्या काळात शनी आणि बुध या दोन ग्रहांमुळे राजयोग तयार होणार आहे.

ऑगस्ट महिन्यात शनि आणि बुध ग्रहाचा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. तब्बल ३० वर्षांनी या राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे. काहींना पैसा मिळणार आहे तर काहींना नवी नोकरी मिळेल. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

नवपंचम राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे. व्यावसायिकांना मोठ्या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते.

सिंह रास

नवपंचम राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. या काळात दैनंदिन उत्पन्न वाढू शकतं. या काळात तुम्हाला एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळू शकण्याची शक्यता आहे. देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता.

कर्क रास

नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे कर्क राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. व्यवसाय किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. या काळात धार्मिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT