Nirjala Ekadashi : निर्जला एकादशीला का ठेवला जातो कठोर व्रत? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

Nirjala Ekadashi 2025: उद्या म्हणजेच ६ जून रोजी निर्जला एकादशी साजरी केली जातेय. हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही निर्जला एकादशी मानण्यात येते.
Nirjala Ekadashi 2025
Nirjala Ekadashi 2025saam tv
Published On

निर्जला एकादशीचं व्रत हा सर्वात कठी मानला जातो. कारण हा उपवास करताना पाण्याचा घोटही प्यायचा नसतो. असं म्हटलं जातं की, निर्जला एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने तुमच्या पूर्वीच्या जन्माचे पापंही नष्ट होता.

धार्मिक मान्यतेनुसार, निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते. हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की ते वर्षातील सर्व एकदाशींच्या फळाएवढं असतं.

Nirjala Ekadashi 2025
Budhwar che Upay: लग्नही होईल, बिझनेसमध्येही मिळेल पैसा; बुधवारच्या दिवशी गणपतीचे हे उपाय करा

विष्णूंना समर्पित व्रत

हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असल्याचं म्हटलं जातं. या दिवशी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. तसंच ते भक्तांवर त्यांचा अनंत आशीर्वाद वर्षाव करतात. त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येऊ शकते.

काय आहे धार्मिक दृष्टीकोन?

धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा उपवास केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शुद्धीकरण देखील प्रदान करते. पाणी आणि अन्न सोडल्याने इंद्रियांवर नियंत्रण वाढतं. ज्यामुळे मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत होऊ शकते. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचं पुण्यकर्म वाढतं. या व्रतामुळे दान आणि तपस्येसारखेच फळ मिळतं.

असं मानण्यात येतं की, जो व्यक्ती निर्जला एकादशीचे व्रत भक्तीने करतो त्याला मृत्युनंतरच्या दूतांची भीती वाटत नाही. शिवाय त्या व्यक्तींला वैकुंठ धाममध्ये स्थान मिळतं. हा कडक उपवास एखाद्या व्यक्तीच्या धर्माप्रती असलेल्या समर्पणाचे आणि देवावरील त्याच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे.

Nirjala Ekadashi 2025
Shani-Budh Kendra Yog: न्यायदेवता शनी बनवणार शक्तीशाली योग; 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

काय आहे यामागील पौराणिक कथा?

पौराणिक कथेनुसार, पांडूचा मुलगा भीमसेन याला अतिप्रमाणात भूक लागली होती. यावेळी भूकेमुळे एकादशीचे व्रत करणं शक्य नव्हते. त्यानंतर महर्षी व्यासांनी त्याला निर्जला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. या व्रतामुळे त्याला वर्षातील सर्व एकादशींचं फळ मिळाले. म्हणूनच तिला "भीमसेनी एकादशी" असंही म्हटलं जातं.

Nirjala Ekadashi 2025
Guruwar che Upay: अडचणी दूर होणार, हाती पैसा येणार; गुरुवारी भगवान विष्णूंसाठी हे उपाय अवश्य करा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com