Remedies To Reduce Pimples freepik
लाईफस्टाईल

Pimple Warning : मुरुम काढण्याच्या निष्काळजीपणाने थेट मेंदूला धोका, या सामान्य समस्येला दुर्लक्षित करु नका

Skin Care : चेहऱ्यावरील मुरुम फोडणे धोकादायक ठरू शकते. मृत्यूच्या त्रिकोणातील मुरुम फोडल्यास संसर्ग थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला आहे की, मुरुम स्वतःहून फोडू नका, त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

चेहऱ्यावरील मुरुम ही महिला आणि पुरुषांमध्ये असणारी सामान्य समस्या मानली जाते. परंतु अनेकदा लोक स्वतःहून किंवा घरच्यांकडून मुरुम फोडून घेतात. अमेरिकेतील तज्त्रांच्या मते एका महिलेच्या बाबतीत असंच घडलं आणि त्यातून गंभीर परिणाम झाला. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मुरुमे आली होती. तिच्या नवऱ्याने तो मुरुम फोडला. पण हा मुरुम चेहऱ्याच्या अत्यंत धोकादायक भागात म्हणजेच “मृत्यूचा त्रिकोण” (Triangle of Death)मध्ये होता. हे त्यांना कळलंच नाही.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा भाग म्हणजे नाकाच्या दोन्ही बाजूंपासून ओठांपर्यंत असणारा त्रिकोण होता. या भागात मोठ्या प्रमाणावर रक्तवाहिन्यांचे जाळे असते आणि जे थेट मेंदूपर्यंत जोडलेले असते. त्यामुळे या ठिकाणी मुरुम फोडल्यास संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्या रुग्णाच्या बाबतीतही असंच घडलं. तिच्या चेहऱ्यावर सूज आली, वेदना वाढल्या आणि तीला थेट आपत्कालीन विभागात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी तिला तातडीने उपचार दिले.

या घटनेनंतर तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला की चेहऱ्याच्या “मृत्यूच्या त्रिकोणात”असलेले मुरुम, फोड किंवा कोणतीही जखम हाताळणे अत्यंत धोकादायक आहे. या भागातील संसर्ग थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि जीवाला धोका निर्माण करू शकतो. बहुतांश वेळा असे घडत नाही, पण जेंव्हा घडते तेंव्हा परिस्थिती गंभीर बनू शकते.

तज्ज्ञांचा सल्ला आहे की चेहऱ्यावर मुरुम असल्यास तो स्वतःहून फोडण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वच्छता, योग्य औषधोपचार आणि त्वचेची निगा यामुळे मुरुमाची समस्या टाळता येते. या प्रसंगामुळे छोट्या वाटणाऱ्या कृतीत किती मोठा धोका लपलेला आहे, हे आपल्याला कळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT