Shreya Maskar
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. हे दोघे प्रेक्षकांचे लाडके कपल आहे.
गायिका मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मुग्धा आणि प्रथमेशने लग्जरी कार खरेदी केली आहे.
मुग्धा-प्रथमेश यांनी मिळून टोयोटाची इनोवा क्रिस्टा ही लग्जरी कार खरेदी केली आहे. कार खरेदी करतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. दोघे त्यांच्या कुटुंबियांसह कार खरेदी करण्यासाठी गेले होते.
मुग्धा-प्रथमेशने पोस्टमध्ये लिहिलं की, "मी सुरुवातीपासूनच TOYOTA चा सर्वात मोठा चाहता आहे...तर, चला आपल्या आणखी एका INNOVA CRYSTAचे मिळून स्वागत करूया..."
मुग्धा-प्रथमेशने नवीन कारची पूजा केली. त्यानंतर मस्त केक देखील कापला. दोघे खूपच आनंदी दिसत आहे. पांढरी शुभ्र गाडीचा लूक खूपच क्लासी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टोयोटाची इनोवा क्रिस्टा कार जवळपास 20 लाख ते 30 लाखांच्या आसपास आहे. या आलिशान कार मध्ये बसून दोघे फिरायला जाताना दिसत आहे.
मुग्धा-प्रथमेशच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. नेटकरी त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत आहेत.
मुग्धा-प्रथमेश यांनी आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहेत. दोघांच मोठा चाहता वर्ग आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या आयुष्याचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करतात.