Liver Health : सलूनमध्ये दाढी करणे खरोखरच सुरक्षित आहे का? लिव्हर संबंधीत धक्कादायक सत्य

Health Awareness : सलूनमध्ये दाढी करताना वापरला जाणारा अस्वच्छ रेझर यकृताला मोठा धोका निर्माण करू शकतो. हिपॅटायटीस बी आणि सी सारखे विषाणू पसरून यकृताचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
Liver Health
Liver Healthfreepik
Published On

आजकाल पुरुष आणि महिला ब्युटी ट्रीटमेंटसाठी सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जातात. त्यापैकी एक म्हणजे दाढी करणे किंवा शेव्हिंग. बहुतांश लोकांना ही एक साधी आणि सुरक्षित प्रक्रिया वाटते. मात्र यामध्ये लपलेला गंभीर धोका फारसा लक्षात घेतला जात नाही. त्यावेळेस न्हावी वापरत असलेले रेझर किंवा शेव्हिंग करताना वापरली जाणारी इतर उपकरणे योग्यरित्या स्वच्छ केली नसतील, तर ती संसर्गजन्य आजारांचा प्रसार करू शकतात. हे आजार थेट आपल्या यकृतावर परिणाम करतात आणि कालांतराने ते जीवघेणे ठरू शकतात.

शेव्हिंगच्या वेळी रेझर अनेक ग्राहकांसाठी वापरले गेले तर रक्त त्वचेच्या माध्यमातून विषाणू शरीरात जाऊ शकतात. त्यापैकी सर्वात धोकादायक उदाहरण म्हणजे हिपॅटायटीस बी आणि सी. हे विषाणू थेट यकृताला हानी पोहोचवतात. कालांतराने ते यकृत सिरोसिस किंवा अगदी यकृताच्या कर्करोगालाही कारणीभूत ठरू शकतात.

Liver Health
e Passport : ई-पासपोर्टसाठी घरबसल्या करा क्षणात अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा या बाबतीत इशारा देतात. यामध्ये अनेक रुग्ण यकृताच्या विषाणूंनी बाधित झाल्याचे दिसून येते आणि त्यांचा इतिहास घेतल्यावर हे स्पष्ट होते की त्यांनी सार्वजनिक सलूनमध्ये दाढी केली होती. जर उपकरणे स्वच्छ नसतील तर विषाणूला शरीरात प्रवेश करण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दाढी करणे ही एक साधी गोष्ट असली तरी ती घाणेरड्या उपकरणांमुळे जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे सलूनमध्ये रेझर आणि उपकरणे स्वच्छ केली आहेत का हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास स्वतःची वैयक्तिक उपकरणे वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. थोडीशी जागरूकता आणि सावधगिरी ठेवल्यास यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवाचे रक्षण करता येऊ शकते. शेवटी, आपले आरोग्य आपल्या हातात आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

Liver Health
Ganesh Chaturthi 2025 : तुमच्या राशीनुसार गणपती बाप्पाला कोणता प्रसाद द्याल? जाणून घ्या खास संबंध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com