Sakshi Sunil Jadhav
ई-पासपोर्ट हा भारत सरकारकडून सुरू केलेला आधुनिक व सुरक्षित प्रवाशांचा पुरावा आहे.
ई-पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असते. ज्यामध्ये धारकाची वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक तपशील सुरक्षितपणे जतन केली जाते.
ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला आता जास्त कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही.
सर्वप्रथम Passport Seva Portal या संकेतस्थळावर जाऊन नवीन नोंदणी करुन घ्यावी.
लॉगिन करून Apply for Fresh Passport या पर्यायावर क्लिक करून सर्व कागदपत्रे घरबसल्या पीडीएफ स्वरुपात अपलोड करावी.
पुढे ऑनलाइन अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
फी ऑनलाइन भरल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात (PSK) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात (POPSK) अपॉइंटमेंट घ्यावी.
ठरलेल्या दिवशी कागदपत्रांची पडताळणी, बायोमेट्रिक व फोटो घेतला जातो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-पासपोर्ट तयार होऊन नोंदणीकृत पत्त्यावर पाठविला जातो.